शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

कलानगर चौकालगत रस्त्यावर धुळीचे लोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:26 IST

येथील कलानगर चौकालगत असलेल्या रस्त्यावर थातूरमातूर पद्धतीने रस्त्यावरील डागडुजी केल्याने मोठ्या प्रमाणात धूळ व बारीक खडी उडत असल्याने रस्त्यालगत असलेल्या नागरी आणि वाहनधारकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

इंदिरानगर : येथील कलानगर चौकालगत असलेल्या रस्त्यावर थातूरमातूर पद्धतीने रस्त्यावरील डागडुजी केल्याने मोठ्या प्रमाणात धूळ व बारीक खडी उडत असल्याने रस्त्यालगत असलेल्या नागरी आणि वाहनधारकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  कलानगर चौक येथून वडाळागाव-डीजीपीनगर क्र मांक १ या मार्गाने पुणे महामार्ग व श्री कृष्णा चौक, राजीवनगर झोपडपट्टीमार्गे मुंबई महामार्ग ये-जा करण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने आणि सार्थकनगर, सराफनगर, पाथर्र्डी गाव चौफुलीमार्गे देवळाली कॅम्पला ये-जा करण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. कलानगर बसथांब्यासमोर आणि राजे छत्रपती चौकासमोरील वाहतूक बेटाशेजारी रस्त्यावर लहान-मोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असे त्याची दखल घेत शनिवारी (दि.२४) महापालिकेच्या वतीने संबंधित ठेकेदारास खड्डे बुजविण्यास सांगण्यात आले असता त्याने डांबर शिंपडून त्यावर खडीची भुकटी टाकून थातूरमातूर पद्धतीने काम केले. रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ आणि खडी उडत असल्याने आज सकाळी रस्त्यालगत असलेल्या कलानगर चौकातील बहुतेक दुकानदाराने आपले दुकाने बंद ठेवली. तसेच रस्त्यावरून मार्गक्र मण करणाऱ्या वाहनधारकांना व पादचाºयांना होणाºया धूळ आणि खडीमुळे अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत होती. तातडीने प्रभागाचे नगरसेवक श्याम बडोदे यांनी रविवार सुट्टीचा दिवस असून, सुद्धा संबंधित अधिकाºयांना तातडीने रस्त्यावरील खडीची भुकटी उचलून रस्ता स्वच्छ करण्याच्या सूचना केल्या. याप्रसंगी परिसरातील दुकानदार आणि नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते आणि थातूरमातूर पद्धतीने काम केल्याने संबंधित ठेकेदाराच्या कामाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माणसंबंधित ठेकेदाराने रस्त्याचे थातूरमातूर पद्धतीने काम केल्याने वाहनधारक, पादचारी आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला काळे यादीत टाकण्याची मागणी नगरसेवक श्याम बडोदे यांनी केली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली होताच महापालिकेच्या वतीने थातूरमातूर पद्धतीने कामास सुरुवात झाल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले. मोठ्या प्रमाणात धूळ आणि बारीक खडी उडत असल्याने वाहनधारक व पादचारी यांना समोरचे दिसणेसुद्धा मुश्किल झाले आहे. रस्त्यावर टाकलेल्या बारीक खडीवरून वाहने घसरून लहान-मोठे अपघात घडत आहे. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad safetyरस्ते सुरक्षा