१०० फूट विहिरीत पडलेल्या तरुणांना जीवदान

By Admin | Updated: March 23, 2016 22:49 IST2016-03-23T22:45:45+5:302016-03-23T22:49:05+5:30

१०० फूट विहिरीत पडलेल्या तरुणांना जीवदान

Lifting the youth in 100 feet well | १०० फूट विहिरीत पडलेल्या तरुणांना जीवदान

१०० फूट विहिरीत पडलेल्या तरुणांना जीवदान

मालेगाव : अग्निशमन दलाचा जवान शकील यांचे धाडसमालेगाव : येथील महानगर-पालिकेच्या अग्निशमन दलाचा कर्मचारी शकील अहमद मोहमद साबीर याने सहकाऱ्यांसह सुमारे शंभर फूट खोल विहिरीत पडलेल्या दोन तरुणांचे प्राण वाचविले. या घटनेतील हे तरुण कुत्र्यांपासून आपल्या बकऱ्यांचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात या विहिरीत पडले होते.
बुधवारी सकाळी नवीद खुर्शीद अहमद (३०) व हफिज अहमद मोहमद सलीम (२८) रा. दोघे रमजानपुरा हे बकऱ्या चारत असताना या बकऱ्यांवर परिसरातील कुत्र्यांच्या कळपाने हल्ला केला. यावेळी या बकऱ्या संरक्षणासाठी सैरावैरा पळू लागल्या. या बकऱ्यांचे कुत्र्यांपासून संरक्षण करण्यासाठी नवीद व हफिज हे प्रयत्न करत असताना परिसरातील सुमारे शंभर फूट खोल कोरड्या विहिरीत पडले. त्यात ते दोघे जखमी झाले होते. त्यांना नागरिकांनी वर काढण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने अग्निशमन दलाला बोलविण्यात आले. यावेळी अग्निशमन दलाचा कर्मचारी शकील जिवाची पर्वा न करता विहिरीत उतरला. त्याने विकास बोरगे, मनोहर तिसगे, राहुल शिरोळे, आबीद खान यांच्या मदतीने या दोघांना विहिरीबाहेर काढले. सदर तरुणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत. (वार्ताहर)

Web Title: Lifting the youth in 100 feet well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.