शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
2
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
3
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
4
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
5
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
7
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक, कोण काय म्हणाले?
8
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
9
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
10
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!
11
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
12
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
13
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
14
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
15
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
16
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंग, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
17
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
18
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
19
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
20
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना

मित्राचा खून करणाऱ्यांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 01:15 IST

नाशिक : जुन्या वादाची कुरापत काढत आपल्या मित्राला मद्य पाजून गळा आवळून चाकूने भोसकून खून केल्याची घटना २०१५ साली ...

ठळक मुद्देजिल्हा न्यायालय : चाकूने भोसकून हत्या केल्याचे सिद्ध

नाशिक : जुन्या वादाची कुरापत काढत आपल्या मित्राला मद्य पाजून गळा आवळून चाकूने भोसकून खून केल्याची घटना २०१५ साली नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या गुन्ह्याचा खटला जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता. गुन्ह्यातील आरोपी रितेश उर्फ राजन जनाजी भालेराव (२१), दीपक छगनराव जाधव (२२) याच्यावर त्याचा मित्र विवेक देवीदास पगारे याचा खून केल्याचा आरोप जिल्हा न्यायालयात सिद्ध झाला. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. जोशी यांनी भालेराव व जाधव या दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.देवळालीगावात राहणारे भालेराव, जाधव या दोघांनी जुन्या वादाची कुरापत काढण्यासाठी १३ फेब्रुवारी २०१५ रोजी रात्री रितेश याने विवेकला दारू पिण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून घरी आणले. मद्यसेवन केल्यानंतर आरोपी रितेश आणि दीपक या दोघांनी मिळून विवेकचा गळा आवळला. त्यानंतर चाकूने भोसकून त्याचा खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी आरोपी भालेराव, जाधव व संशयित राहुल भालेराव या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नाशिकरोड पोलिसांनी दाखल केला. पोलिसांनी या तिघांना अटक केली होती. खुनाच्या गुन्ह्याचे परिस्थितीजन्य पुरावे गोळा केल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र पोलिसांनी सादर केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू होती. सरकारी पक्षाच्या वतीनेअ‍ॅड. शिरीष जी. कडवे यांनी युक्तिवाद केला. त्यात त्यांनी २१ साक्षीदार तपासले. साक्षीदरम्यान एकही साक्षीदार फितूर न झाल्याने आरोपींविरोधात ठोस पुरावे सिद्ध झाले. विवेक व रितेशला शेवटचे सोबत पाहिल्याचा पुरावा यावेळी महत्त्वाचा ठरला. त्यामुळे न्यायालयाने रितेश भालेराव आणि दीपक जाधव यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर ठोस पुरावे नसल्याने राहुल भालेराव याची निर्दोष मुक्तता केली.मृतदेह शौचालयाच्या टाकीतविवेकचा गळा आवळल्यानंतर चाकूने सपासप वार करून रितेश, दीपक यांनी ठार मारले. यानंतर मयत विवेकचा मृतदेह त्यांनी एका बेडशिटमध्ये गुंडाळला आणि पोत्यात भरला. परिसरातील एका सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टाकीत मृतदेह पोत्यासह टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय