ऊर्जेच्या सकारात्मकतेतून बदलेल जीवनशैली: हाके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:15 IST2021-05-12T04:15:03+5:302021-05-12T04:15:03+5:30
नाशिक वसंत व्याख्यानमालेच्यावतीने आयोजित स्व. बाबुराव हाके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'सकारात्मक जीवनशैली'या विषयावर मंगळवारी (दि.११) पुष्प गुंफताना ते बोलत होते. ...

ऊर्जेच्या सकारात्मकतेतून बदलेल जीवनशैली: हाके
नाशिक वसंत व्याख्यानमालेच्यावतीने आयोजित स्व. बाबुराव हाके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'सकारात्मक जीवनशैली'या विषयावर मंगळवारी (दि.११) पुष्प गुंफताना ते बोलत होते. आपल्यात ऊर्जा आहे,म्हणूनच जीवनाचा मार्ग व्यतित करतोय, त्यासाठी सकारात्मकता हवीय, नकारात्मक विचार समाजात दुही,नैराश्य प्रसृत करतात,त्यामुळे सामाजिक व्यवस्था ढासळण्याची भीती विजय हाके यांनी व्यक्त केली.
ऊर्जेला सकारात्मक दृष्टी देण्यासाठी ज्ञानाची गरज असते. तसे झाल्यास जगाकडे पाहण्याची दृष्टी आणि दृष्टिकोन बदलू शकेल. सकारात्मक ऊर्जा लोकांना आकर्षित करते, तुमचे विचार, आचार अशा समाजाचे संघटन करण्यासाठी पूरक ठरतात,असेही विजय हाके यांनी सांगितले.
श्री श्री रविशंकरजी यांच्या विचारांचे पैलू विशद करताना जीवनात विस्मय केल्यास स्वभाववैशिष्ट्ये बदलू शकतात,सध्या समाज अस्वस्थ आहे, कारण की ऊर्जेची कमतरता. म्हणून लोकांनी भीती बाळगता कामा नये, कोरोना हा इतर विषाणूसारखा विषाणू आहे. निसर्ग आपली परीक्षा घेत असून, त्यात उत्तीर्ण होण्याची जबाबदारी आपलीच आहे. म्हणून परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टीने पहा, जीवन सुंदर होण्याचे दिवस दूर नाही ,अशा शब्दात विजय हाके यांनी समाजाला आश्वस्त केले.
व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले,तर चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.
आजचे व्याख्यान-
सुधीर मुतालिक
विषय- उद्योगांपुढील आव्हाने आणि संधी
....
छायाचित्र आर फोटोवर ११ विजय हाके