शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

विद्यार्थिनींसाठी जीवनदायिनी ‘अटल आरोग्य वाहिनी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:47 AM

आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांसाठी राबविण्यात येणाऱ्या अटल आरोग्य वाहिनी योजना कळवण तालुक्यातील १५ वर्षीय चंद्रभागा मोहन चौरे या नववीतील विद्यार्थिनीस जीवनदायिनी ठरली आहे. या विद्यार्थिनीच्या हृदयावर मुंबईच्या केइएम रुग्णालयात गुरुवारी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून, आता तिची प्रकृती स्थिर आहे.

ठळक मुद्दे२.८५ लाखांचा खर्च : कळवण तालुक्यातील विद्यार्थिनीला मिळाली मदत

नाशिक : आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांसाठी राबविण्यात येणाऱ्या अटल आरोग्य वाहिनी योजना कळवण तालुक्यातील १५ वर्षीय चंद्रभागा मोहन चौरे या नववीतील विद्यार्थिनीस जीवनदायिनी ठरली आहे. या विद्यार्थिनीच्या हृदयावर मुंबईच्या केइएम रुग्णालयात गुरुवारी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून, आता तिची प्रकृती स्थिर आहे.कळवण तालुक्यातील गोपाळखडी येथील शासकीय आश्रमशाळेत दीड वर्षांपूर्वी अटल आरोग्य वाहिनीमार्फत करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत इयत्ता नववीतील चंद्रभागा चौरे या विद्यार्थिनीस हृदयाचा आजार असल्याचे स्पष्ट झाले होते. तिच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाºया रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होऊन रक्तवाहिनी दाबली असल्याचे आढळून आले. त्यामुळे हृदयास पुरेसा रक्तपुरवठा होत नव्हता. यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. अटल आरोग्य वाहिनीच्या माध्यमातून चंद्रभागाला जिल्ह्णातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. परंतु तिच्यावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे समजल्यानंतर तिच्या पालकांना भीती वाटू लागली. त्यामुळे त्यांनी उपचारास तयारी दर्शविली नाही. अटल वाहिनीच्या डॉक्टरांनी तिच्या पालकांचे समुपदेशन केल्यानंतर त्यांनी मुलीवर शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली.तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार २६ डिसेंबर रोजी मुंबईतील केइएम रुग्णालयात तिची तपासणी करण्यात आली. आजाराचे निदान झाल्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी तिची अ‍ॅँजिओग्राफी करण्यात आली. मात्र तिचे वय अवघे १५ वर्षे असल्याने शस्त्रक्रिया करणे जोखमीचे होते. मात्र केईएम रुग्णालयातील डॉक्टरांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळाल्यानंतर २० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता चंद्रभागाच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दाबल्या गेलेल्या रक्तवाहिनीत स्टेन टाकण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर तिला श्वास घेण्यास कोणताही अडथळा येत नाही. तिची प्रकृतीही स्थिर आहे. शस्त्रक्रियेसाठी लागणारा संपूर्ण खर्च आदिवासी विकास विभागाकडून शासकीय आश्रमशाळांच्या शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात येणाºया निधीतून करण्यात आला. उपचारासाठी एकूण दोन लाख ८५ हजार रुपये खर्च करण्यात आला.गणित शिक्षकाची रुग्णालयात सोबतगोपाळखडी आश्रम शाळेतील गणित विषयाचे शिक्षक रोशन शेळके यांची चंद्रभागाला उपचारादरम्यान चांगली मदत झाली. दुर्गम आदिवासी भागात असलेल्या घरातून रुग्णालयापर्यंत नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. रुग्णालयात १५ दिवस ते तिच्यासोबत होते. यादरम्यान त्यांनी विविध जबाबदाºया पार पाडल्या. तिच्या आईवडिलांनाही त्यांची मदत झाली.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल