मुरमट्टी ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 01:16 IST2020-08-24T23:03:30+5:302020-08-25T01:16:51+5:30

पेठ : तालुक्यातील मुरमट्टी गावाच्या ग्रामस्थांना वर्षानुवर्षे नदीच्या पुरातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने नदीवर पूल व पक्का रस्ता करण्याची मागणी होत आहे. नदी गावाला वळसा घालून जात असल्याने पावसाळ्यात या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटतो.

A life threatening journey of Murmatti villagers | मुरमट्टी ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास

पाण्यातून वाट : ... मुरमट्टी, ता. पेठ येथे पुलाअभावी पूरपाण्यातून मार्ग काढताना महिला व विद्यार्थी.

ठळक मुद्देगैरसोय : संपर्क तुटल्याने नदीला वळसा

लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : तालुक्यातील मुरमट्टी गावाच्या ग्रामस्थांना वर्षानुवर्षे नदीच्या पुरातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने नदीवर पूल व पक्का रस्ता करण्याची मागणी होत आहे. नदी गावाला वळसा घालून जात असल्याने पावसाळ्यात या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटतो.
गावात येण्यासाठी पूल वा रस्ता नसल्याने ग्रामस्थांना नदीच्या पुरातून जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. अनेक वर्षांपासून ग्रामस्थांनी शासन दरबारी मागणी करूनही या नदीवर पूल होत नसल्याने ग्रामस्थांनी थेट विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन मुरमट्टी गावाजवळच्या नदीवर पूल व पक्का रस्ता तसेच इंटरनेट सेवेसाठी टॉवर उभारण्याची मागणी केली.
याप्रसंगी देवीदास कामडी, अशोक तांदळे, दुर्वादास गायकवाड, मंगेश पवार, पोपट महाले, अनिल बोरसे, पांडुरंग तांदळे, रामदास फसाळे, सोमनाथ जाधव, पांडुरंग माळेकर, किसन गोराळे, रमेश घुले गंगाधर बेडकोळी, मनोहर साहरे, पंढरीनाथ भुसारे, भावराज चौधरी, वामन फसाळे, गोपाळ पाडवी, गोपाळ बोरसे, अमृता साहरे, मोहन फसाळे आदी उपस्थित होते.गावात जाण्यासाठी प्रथम नदीच्या पाण्याचा सामना करावा लागतो. नदीत पाण्याचा प्रवाह जास्त असल्यास काही वेळा रात्र नदीच्या पल्याडच काढावी लागते. शाळेत येणाऱ्या मुलांना धोकादायक फरशीपुलावरून जीव मुठीत धरून नदी पार करावी लागते.
- मनोहर सहारे, ग्रामस्थ, मुरमट्टी

Web Title: A life threatening journey of Murmatti villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.