शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अपघातातील जखमी कोल्ह्याला जीवदान; पुण्याच्या रेस्क्यू केंद्रात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 21:11 IST

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत सातपुरपासून पुढे मळे परिसर व विरळ, मध्यम स्वरुपाचे जंगल आहे. या रस्त्यालगत वासाळी शिवारात तरस तर पुढे अंजनेरी शिवारात बिबट्या, पेगलवाडी-पहिने फाट्याच्या परिसरात कोल्हे यांसारख्या वन्यजीवांचा वावर आढळतो.

ठळक मुद्देमध्यरात्री दाखविली तत्परताप्रकृतीत सुधारणा; लवकरच मुक्तता

नाशिक : शहर व परिसरात रात्रीच्या सुमारास बेफामपणे वाहने चालविणाऱ्यांमुळे अपघाताच्या घटना सातत्याने घडतात. यास वन्यप्राणीदेखील अपवाद नाही, अशाचप्रकारे एका भरधाव वाहनाच्या धडकेत पेगलवाडी फाट्यावर अंदाजे दोन वर्षांचा कोल्हा (मादी) गंभीर जखमी झाला होता. याबाबत माहिती मिळताच वन्यजीवप्रेमी व वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी नाशिक येथून धाव घेत जखमी कोल्ह्याला 'रेस्क्यू' केले. वन अधिकारी, कर्मचारी यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे वेळेवर प्रथमोपचार मिळाल्याने कोल्ह्याला जीवदान लाभले.नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत सातपुरपासून पुढे मळे परिसर व विरळ, मध्यम स्वरुपाचे जंगल आहे. या रस्त्यालगत वासाळी शिवारात तरस तर पुढे अंजनेरी शिवारात बिबट्या, पेगलवाडी-पहिने फाट्याच्या परिसरात कोल्हे यांसारख्या वन्यजीवांचा वावर आढळतो. रात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात हे वन्यप्राणी आपली जागा सोडून भटकंती करतात. गुरुवारी (दि.१७) मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास पेगलवाडी फाट्याजवळ त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पुलावरुन जाणाऱ्या कोल्ह्याला एका भरधाव वाहनाने धडक दिली. धडकेत कोल्ह्याच्या जबड्याला जबर मार बसला आणि त्याचे दातही तुटले. कोल्हा रक्तबंबाळ अवस्थेत विव्हळत कठड्यालगत पडलेला होता. याबाबतची माहिती नाशिक वनविभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वन्यजीवप्रेमी वैभव भोगले आदींनी तत्काळ घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली. कोल्ह्याची अवस्था बघून तातडीने त्यास जागेवरच प्रथमोपचार दिले आणि उंटवाडी येथील वनविभागाच्या विश्रामगृहात हलविले.प्रकृतीत सुधारणा; लवकरच मुक्ततासकाळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोल्ह्याची तपासणी करुन औषधोपचार दिले. यानंतर कोल्ह्याला वनखात्याच्या वाहनातून पुण्याच्या बावधान येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या रिहॅबिटेशन केंद्रात पुढील उपचाराकरिता हलविण्यात आले. तेथे मागील दोन दिवसांपासून उपचार सुरु असून कोल्ह्याची प्रकृतीत मोठी सुधारणा झाल्याचे दिसून येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच कोल्ह्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार असल्याचे भदाणे यांनी सांगितले.

टॅग्स :forest departmentवनविभागNashikनाशिकwildlifeवन्यजीवAccidentअपघात