तरुणीचा निर्घृण खून करणाºयास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:15 IST2017-09-28T00:15:22+5:302017-09-28T00:15:28+5:30

विवाहास नकार दिल्याच्या रागातून उच्चशिक्षित तरुणीवर कटरने वार करून तिचा निर्घृण खून करणारा आरोपी शशिकांत शांताराम टावरे (२६, रा़ पळसे) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ १८ मे २०१६ रोजी पळसे येथील शाळेत युवतीच्या खुनाची घटना घडली होती़ या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील गायत्री पटनाला यांनी या खटल्याचे काम पाहिले़

Life imprisonment for murdering a young woman | तरुणीचा निर्घृण खून करणाºयास जन्मठेप

तरुणीचा निर्घृण खून करणाºयास जन्मठेप

नाशिक : विवाहास नकार दिल्याच्या रागातून उच्चशिक्षित तरुणीवर कटरने वार करून तिचा निर्घृण खून करणारा आरोपी शशिकांत शांताराम टावरे (२६, रा़ पळसे) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ १८ मे २०१६ रोजी पळसे येथील शाळेत युवतीच्या खुनाची घटना घडली होती़ या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील गायत्री पटनाला यांनी या खटल्याचे काम पाहिले़  पळसे येथील आरोपी शशिकांत टावरे व तेथीलच एमबीए झालेली ज्योती सुदाम थेटे यांच्यात मैत्री होती़ मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर २८ जानेवारी २०१६ रोजी त्यांनी विवाह नोंदणी कार्यालयात विवाहासाठी अर्जही केला होता़ मात्र, ज्योतीच्या मोठ्या बहिणीचा विवाह होणे बाकी असल्याने घरच्यांनी समजावल्यानंतर ३ फेब्रुवारीला नोंदणीचा अर्ज तूर्तास मागे घेतला होता़ या गोष्टीचा राग आलेल्या शशिकांत याने १८ मे २०१६ रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास ज्योतीला तिच्या घराच्या पाठीमागील संत आईसाहेब विद्यालयातील रूम नंबर चारमध्ये बोलावून घेतले आणि कटरने अठरा वार करून तिचा खून केला़ यानंतर स्वत:च्या हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला़ या प्रकरणी कुसुम थेटे यांच्या फिर्यादीवरून १९ मे रोजी नाशिकरोड पोलीस ठाण्यात शशिकांत टावरे याच्या विरोधात खून व आत्महत्येचा प्रयत्न असे गुन्हे दाखल करण्यात आले होते़ न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील गायत्री पटनाला यांनी १४ साक्षीदार तपासून आरोप सिद्ध केले तर बचाव पक्षाच्या वकिलांनी, शशिकांत व ज्योती यांनी युक्तिवाद न्यायाधीशांनी फेटाळून लावला़

Web Title: Life imprisonment for murdering a young woman