धावत्या रेल्वेपुढे उडी घेत संपविले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:12 IST2021-07-15T04:12:26+5:302021-07-15T04:12:26+5:30

पहिल्या घटनेत शशिकांत संतू उन्हवणे (५५, रा. प्रशांतनगर, पाथर्डी फाटा) यांनी मंगळवारी अंबड येथील एका कंपनीत गळफास घेत आत्महत्या ...

Life ended by jumping in front of a running train | धावत्या रेल्वेपुढे उडी घेत संपविले जीवन

धावत्या रेल्वेपुढे उडी घेत संपविले जीवन

पहिल्या घटनेत शशिकांत संतू उन्हवणे (५५, रा. प्रशांतनगर, पाथर्डी फाटा) यांनी मंगळवारी अंबड येथील एका कंपनीत गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. दुसऱ्या घटनेत इंदिरानगर परिसरातील परबनगर भागातील रहिवासी अनिल सोनू क्षीरसागर (५४) यांनी बुधवारी राहत्या घरात सायंकाळी गळफास घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला. तिसऱ्या घटनेत भगूर शिवार परिसरात रेल्वेसमोर उडी मारून एका युवकाने आत्महत्या केली. या युवकाची ओळख अद्याप पटलेली नसून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चौथ्या घटनेत एका इसमाचा मृतदेह टाकळी गावाजवळ नंदिनी नदीच्या पात्रात बुधवारी (दि. १४) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास आढळून आला. या इसमाचीही ओळख पटविण्याचे काम सुरू होते. आत्महत्या की घातपात याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Web Title: Life ended by jumping in front of a running train