झाडावर अडकलेल्या पक्ष्याला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:53 IST2020-02-23T23:00:06+5:302020-02-24T00:53:39+5:30
स्वत:चा जीव धोक्यात घालून लिंबाच्या झाडाला मांजा पायात अडकलेल्या पक्ष्याचा जीव वाचविण्यात तालुक्यातील वावी येथील पक्षिप्रेमी विजय रखमा संधान याला यश आले.

झाडावर अडकलेल्या पक्ष्याला जीवदान
वावी : स्वत:चा जीव धोक्यात घालून लिंबाच्या झाडाला मांजा पायात अडकलेल्या पक्ष्याचा जीव वाचविण्यात तालुक्यातील वावी येथील पक्षिप्रेमी विजय रखमा संधान याला यश आले.
येथील भैरवनाथ नगरमध्ये विलास सच्चे यांच्या घराजवळ रात्रीच्यावेळी झाडावर एक पक्षी अडकल्याचे पाहून त्यांनी पक्षिप्रेमी संधान यांच्याशी संपर्क साधला. तो पक्षी जास्त उंचावर असल्याने जीव वाचविणे अवघड होते.
झाडाच्या शेंड्याला कोवळ्या फांदीला हा पक्षी रात्रीपासून सुटकेची अपेक्षा करीत होता. दुसऱ्या दिवशी सकाळपासून अडकलेल्या जखमी पक्ष्याला कावळ्यांचा त्रास सहन करावा लागत होता. ग्रामस्थांची गर्दी झाली होती, मात्र विजय याने झाडावर चढण्याचे धाडस केले. शेंड्यापर्यंत पोहोचून अलगद व हळुवारपणे मांजापासून जखमी पक्ष्याला मुक्त केले. यावेळी आकाश वेलजाळी, संतोष नवले, संजय नवले, दीपक शेलार, शशिकांत कांदळकर, सुनील रसाळ, विलास सच्चे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. झाडावरून खाली उतरल्यानंतर पक्ष्याच्या पायात अडकलेला मांजा मोकळा करून त्याला जीवदान दिले. या दरम्यान विजय याच्या अंगाला बºयाच इजा झाल्या होत्या.