धान्य वितरणात अनियमितता आढळल्यास परवाना रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:13 IST2021-05-08T04:13:47+5:302021-05-08T04:13:47+5:30
शहरातील पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना लाभाप्रमाणे धान्य मिळत नसल्याची तक्रार आमदार मुफ्ती यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली हाेती. विजयानंद शर्मा यांनी तातडीने धान्य ...

धान्य वितरणात अनियमितता आढळल्यास परवाना रद्द
शहरातील पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना लाभाप्रमाणे धान्य मिळत नसल्याची तक्रार आमदार मुफ्ती यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली हाेती. विजयानंद शर्मा यांनी तातडीने धान्य वितरण अधिकाऱ्यांना चाैकशीचे निर्देश दिले हाेते. त्यानुसार अंत्याेदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना धान्याची पावती देणे, अंत्याेदय कार्डधारकांना प्रतिकार्ड वीस रुपये दराने एक किलाे साखर देणे, स्वस्त धान्य दुकानाच्या परवान्यात जाे पत्ता आहे त्याच ठिकाणी धान्याची साठवणूक करून वाटप करावे, अशा सूचना करण्यात आल्या, तसेच परवाना रद्द करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केला जाणार आहे. नागरिकांना धान्य मिळत नसेल तर त्यांनी धान्य वितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
इन्फो
गुन्हा दाखल करण्याचा इशारा
मे महिन्यात अंत्याेदय व प्राधान्य कुटुंबांना माेफत धान्य दिले आहे. लाभार्थ्यांनी दुकानात जाऊन आपले माेफत धान्य प्राप्त करून घ्यावे. सध्या काेराेनामुळे कार्डधारकांचे ठसे न घेता दुकानदारांचे ठसे घेऊन धान्य वितरण सुरू आहे. ऑनलाइन धान्य वितरणात नियतनापेक्षा जास्त धान्य वितरण केल्याचे दिसल्यास दुकानदाराविराेधात जीवनावश्यक वस्तू अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.