जिल्ह्यातील ८७३ शाळांमध्ये वाचनालय विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:13 IST2020-12-25T04:13:03+5:302020-12-25T04:13:03+5:30
नाशिक : जिल्हा परिषद आणि नाशिक प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांच्या मदतीने ‘रुम टू रीड’ संस्थेने प्राथमिक शाळेत वाचनालय ...

जिल्ह्यातील ८७३ शाळांमध्ये वाचनालय विकास
नाशिक : जिल्हा परिषद आणि नाशिक प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांच्या मदतीने ‘रुम टू रीड’ संस्थेने प्राथमिक शाळेत वाचनालय विकास प्रकल्प सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत ५९ केंद्रांद्वारे ७८३ प्राथमिक शाळांमध्ये अशाप्रकारे वाचन कक्ष सुरू झाले असून, २०२३ पर्यंत एकूण २४७ केंद्रांद्वारे ३२७७ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील बालकांपर्यंत या उपक्रमातून पुस्तके पोहोचणार आहेत.
प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे उपसंचालक, जालिंदर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हा ग्रंथालय विकास प्रकल्पाची जिल्हास्तरीय बैठक बुधवारी (दि. २३) पार पडली. या बैठकीत आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात वर्ष २०१९ ते २०२२ पर्यंत सिन्नर, इगतपुरी, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांतील एकूण ५९ केंद्रांद्वारे ७८३ प्राथमिक शाळांमध्ये कार्यक्रम सुरू केले आहे, तर दुसऱ्या टप्प्यात २०२० ते २०२२ पर्यंत दिंडोरी, पेठ, निफाड, सुरगणा, येवला व चांदवड या ६ तालुक्यांमध्ये वाचनालय विकासाचे काम सुरूरु करण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात २०२१ ते २०२३ पर्यंत बागलान, देवळा, कळवण, मालेगाव व नांदगाव या ५ तालुक्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून, केंद्र स्तरावर एका शाळेत बालस्नेही बालवाचनालय स्थापित करण्यात येणार आहे.