शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

जिल्ह्यातील २७३ घरांचे पत्र उडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:15 AM

नाशिक : अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा फटका नाशिक जिल्ह्यातील १० तालुक्यांना बसला असून २७३ घरांची वादळात ...

नाशिक : अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा फटका नाशिक जिल्ह्यातील १० तालुक्यांना बसला असून २७३ घरांची वादळात पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या वादळात शाळा तसेच प्राथमिक आरेाग्य केंद्रांचेही नुकसान झाले. गुजरात सीमेलगत असलेल्या पेठ आणि सुरगाणा तालुक्याला या वादळाचा सर्वाधिक फटका बसला. जिल्ह्यातील एकूण ९६ गावांमधील नागरिकांना वादळाचा सामना करावा लागला.

‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून जिल्ह्यातील सुरगाण्यासह पाच तालुक्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला होता. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, हरसूल भागातील काही घाटमाथ्यासह जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाजदेखील हवामान विभागाने वर्तविला होता. या वादळात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण, देवळा, चांदवड, निफाड तसेच सिन्नर तालुक्यातील मालमत्तेचे नुकसान झाले.

सुरगाणा तालुक्यात सर्वाधिक ११२ घरांचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले. त्यापाठोपाठ पेठ तालुक्यात ६५ घरांचे नुकसान झाले. कळवण तालुक्यात ५६ घरांची पडझड झाली असून दिंडोरीत आठ घरांचे नुकसान झाले. देवळा, चांदवड सिन्नर, निफाड मध्येही काही घरांना फटका बसला. त्र्यंबकेश्वरमध्ये जिल्हा परिषदेच्या तीन शाळांची पडझड झाली. त्याबरोबरच सुरागाणा येथेही चार शाळांचा काही भाग कोसळला. या तालुक्यांमध्ये प्राथमिक आरेाग्य केंद्रांचेदेखील नुकसान झाले. काही ठिकाणी शेडनेट, कांदा चाळीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या वादळामुळे जिल्ह्यातील आंबा तसेच भाजीपाला पिकांचादेखील नुकसान झाले असून पीक नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. देवळा तसेच सिन्नरमध्ये बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

--इन्फो--

दीड हजार शेतकऱ्यांचे नुकसान सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे दीड हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले. शेतपिकांचे नुकसान झाले तर कांदा चाळीतील कांदादेखील खराब झाला. अनेक तालुक्यांमधील फळबागांचे नुकसान झाले. पेठ तालुक्यातील २०५ हेक्टरवरील आंबा पिकांचे नुकसान झाले तर त्र्यंबेकेश्वर तालुक्यातील ८.८६ हेक्टरवरील आंबा पीकदेखील जमिनीवर आले. सिन्नर तालुक्यातील डाळींब बागादेखील उद्‌ध्वस्त झाल्या.