‘आम्हाला फक्त शिकवू द्या...!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:14 IST2020-02-01T23:02:23+5:302020-02-02T00:14:36+5:30
‘आता आम्हाला फक्त शिकवू द्या...’ असे आर्जव करत बीएलओ आणि अन्य अशैक्षणिक कामांच्या विरोधात शिक्षक समितीच्या वतीने शनिवारी (दि. १) नांदगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

नांदगाव येथे अशैक्षणिक कामांच्या विरोधात आंदोलनात सहभागी शिक्षक समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
साकोरा : ‘आता आम्हाला फक्त शिकवू द्या...’ असे आर्जव करत बीएलओ आणि अन्य अशैक्षणिक कामांच्या विरोधात शिक्षक समितीच्या वतीने शनिवारी (दि. १) नांदगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाबाबत भूमिका मांडताना सांगितले, शिक्षकांचे मुख्य काम अध्यापन असताना त्यांना बीएलओ व इतर अशैक्षणिक कामे भरपूर प्रमाणात देण्यात येतात. परिणामी शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा विपरीत परिणाम होत असतो. त्याची झळ प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना बसत असते. जनगणना व निवडणूक ही दोनच कामे प्रामुख्याने बांधील असताना अन्य अशैक्षणिक कामाने शिक्षण क्षेत्रात बाधा आणली आहे. सर्वच माहिती आॅनलाइन व ताबडतोब द्यावी लागत असल्याने यंत्रणेवर ताण पडत आहे. सदर अशैक्षणिक कामांच्या जबाबदाऱ्यांतून मुक्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी धरणे आंदोलनात शिक्षक समितीच्या नांदगाव शाखेचे अध्यक्ष रवींद्र बोरसे, मवाळ, सरचिटणीस अनिल बोरसे, जिल्हा पदाधिकारी संजय बच्छाव, राजेंद्र कदम, अनिल धोंडगे, संजय शेवाळे, धोंडीराम पठाडे, राजकुमार बोरसे, गौतम पाटील, आर.आर. बोरसे, सुरेश मोरे, प्रेमसिंग जाधव, शिक्षक भारतीचे पाटील, पदवीधर संघटनेचे प्रकाश मोरे, जुनी पेन्शन संघटनेचे विजय तुरकुने यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.