भारत विश्र्वगुरू होऊ दे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प ; गंगापूजनसह केली महाआरती

By संकेत शुक्ला | Published: January 12, 2024 01:59 PM2024-01-12T13:59:54+5:302024-01-12T14:01:48+5:30

दक्षिणेची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पूजन केलं.

Let India be a global leader Prime Minister Narendra Modi s resolution Maha Aarti done with Ganga Pujan | भारत विश्र्वगुरू होऊ दे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प ; गंगापूजनसह केली महाआरती

भारत विश्र्वगुरू होऊ दे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प ; गंगापूजनसह केली महाआरती

नाशिक : दक्षिणेची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गंगापूजन करून रामतीर्थ येथे दर्शन घेत विधीवत पूजा व आरती केली. भारत विश्वगुरू होऊ दे, असा संकल्प त्यांनी यावेळी केला.

यावेळी गंगा पुरोहित संघाच्यावतीने अध्यक्ष व विश्वस्त यांच्याकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना चांदीचा अमृत कलश, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

पुरोहित संघ अध्यक्ष सतीश शंकर शुक्ल, दिलीप शुक्ल, चंद्रशेखर पंचाक्षरी, प्रतिक  शुक्ल, वैभव दिक्षित, चंद्रशेखर  गायधनी, शेखर  शुक्ल, अतुल गायधनी, अमित पंचभैये, वैभव बेळे, भालचंद्र शौचे, उपेंद्र देव आदीसह पुरोहित संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Let India be a global leader Prime Minister Narendra Modi s resolution Maha Aarti done with Ganga Pujan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक