शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ पाहणी दौ-याकडे अधिका-यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 17:10 IST

पालकमंत्र्यांची हतबलता : लोकप्रतिनिधींचा मात्र सुकाळ, तक्रारींचा पाऊस

ठळक मुद्दे आचारसंहितचा बाऊ करुन अधिकारी उपस्थित राहत नसल्याची हतबलता खुद्द पालकमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखविली

शैलेश कर्पे, सिन्नर : राज्यातील लोकसभा निवडणुकीचा धुराळा खाली बसतो ना बसतो तोच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक जिल्ह्यात दुष्काळ पाहणी दौ-याचे नियोजन केले. मात्र आचारसंहिता अद्याप संपली नसल्याचे कारण देत विविध तलाठ्यांपासून प्रांताधिका-यांसह विविध खात्याच्या शासकीय अधिका-यांनी पालकमंत्र्यांच्या दौ-याकडे अक्षरश: पाठ फिरवली. आचारसंहितचा बाऊ करुन अधिकारी उपस्थित राहत नसल्याची हतबलता खुद्द पालकमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखविली. अधिका-यांविना पालकमंत्र्याच्या दुष्काळ पाहणी दौ-यात मात्र लोकप्रतिनिधींचा ‘सुकाळ’ दिसून आला.पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक जिल्ह्याच्या दुष्काळ पाहणी दौ-यास सिन्नर तालुक्यातून प्रारंभ केला. त्यापूर्वी आपण अधिका-यांना सोबत येण्यासाठी बोललो होतो असे महाजन म्हणाले. मात्र आचारसंहितेचे कारण देत एकही अधिकारी दुष्काळाच्या दौ-यात सहभागी झाला नाही. शेतकरी एक सांगतात, अधिकारी वेगळं बोलतात. सर्वजण समोरासमोर नसल्याने अडचणी वाढल्या. दरवेळी फोनवर अधिका-यांना बोलून सूचना देणे अवघड झाल्याची हतबलताही पालकमंत्र्यांनी बोलून दाखविली.तालुक्यातील भोकणी, पांगरी, वावी व पंचाळे या दुष्काळी गावांना भेटी दिल्यानंतर शेतकरी व ग्रामस्थांनी अक्षरश: तक्रारींचा पाऊस पाडला.

टॅग्स :NashikनाशिकGirish Mahajanगिरीश महाजन