डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना आता आग विझविण्याचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:15 IST2021-04-20T04:15:41+5:302021-04-20T04:15:41+5:30
नाशिक : शहरात विविध भागात कोविड सेंटर्स वाढू लागले आहेत. तथापि, त्यामुळे रुग्णांच्या आरोग्य उपचाराबराबेरच अन्य सुरक्षिततेचा विषयदेखील ...

डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना आता आग विझविण्याचे धडे
नाशिक : शहरात विविध भागात कोविड सेंटर्स वाढू लागले आहेत. तथापि, त्यामुळे रुग्णांच्या आरोग्य उपचाराबराबेरच अन्य सुरक्षिततेचा विषयदेखील महत्त्वाचा असल्याने आता महापालिकेने आपत्कालीन बचाव प्रशिक्षणाचे धडे सुरू केले आहेत. महापलिकेच्या मेरी, ठक्कर डोम आणि सिडकोतील राजे संभाजी स्टेडियममध्ये यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले.
अग्निशमन दलाकडून मनपाच्या सर्व कोविड केअर सेंटरमध्ये आपत्कालीन बचाव प्रशिक्षणास प्रारंभ
राज्यभरातील काही कोविड केअर सेंटरमध्ये आग लागून दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आगीच्या घटना घडू नये किंवा तशी आपत्ती आलीच तर यंत्रणा सज्ज असावी यासाठी महानगरपालिकेच्या विविध कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयांमध्ये आपत्कालीन बचाव कार्याचे प्रशिक्षण देण्यास अग्निशमन दलाने सुरुवात केलेली आहे.
महापालिकेच्या तिन्ही कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सुरक्षारक्षक यांना आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन साधने कशी वापरायची याबाबत प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या महापालिकेच्या कोविड सेंटर्समध्ये उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्या ठिकाणी वातानुकूलित यंत्रणा बसविलेली आहे. तसेच पंख्यांसाठी वायरिंग केलेली असल्याने काही दुर्घटना घडल्यास पूर्व दक्षतेचा भाग म्हणून एबीसी टाईप व सीओटू या प्रकारातील आग विझविण्यास लागणारी साधनेदेखील तयार ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना या साधनांच्या वापराची प्रात्याक्षिके करून दाखविण्यात आली.
इन्फो..
रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ठक्कर डोम येथील कोविड केअर सेंटरच्या ठिकाणी महापालिकेने एक अग्निशमन बंब आणि २४ कर्मचारी तास तैनात करणेत आलेला आहे. तसेच मंगळवारी (दि. २०) नाशिक-पुणे रोड येथील समाजकल्याण कोरोना कक्ष, हिरावाडी येथील स्व. मीनाताई ठाकरे स्टेडियम व डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय येथे हे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती अग्निशमन दल प्रमुख एस.के. बैरागी यांनी दिली.