शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची कर्जफेडीकडे पाठ

By admin | Updated: March 27, 2017 00:52 IST

सायखेडा : शेती आणि शेतीसंदर्भातील मध्य मुदत पीककर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी धावपळ यंदा मार्च एण्डजवळ आला तरी किंचितही पाहायला मिळत नाही.

सायखेडा : शेती आणि शेतीसंदर्भातील मध्य मुदत पीककर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी धावपळ यंदा मार्च एण्डजवळ आला तरी किंचितही पाहायला मिळत नाही. शेती आणि शेतीवर आधारित सर्व कर्ज मार्च महिन्यात भरावे लागते. शेतीचे उत्पन्न झाले असो अथवा नसो पण मार्च महिन्यात सोसायटीचे कर्ज फेडावेच लागते. प्रत्येक वर्षी मार्च महिना आला की शेतीवरील पीककर्ज आणि मध्यम मुदत कर्जफेड करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असायची; पण सलग तीन वर्षे दुष्काळी स्थितीमुळे आणि यंदा शेतमालाला असलेला कवडीमोल भाव यामुळे शेतकरी संपूर्ण डभघाईस गेल्यामुळे कर्जफेडीकडे त्याने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने अनेक मोठ्या सहकारी सोसायटी आणि जिल्हा बँकेच्या शाखांना दिलेले वसुलीचे टार्गेट आता कसे पूर्ण होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीमालाचे शासन स्तरावरील निर्यातीचे कुचकामी धोरण असल्याने शेती सतत तोट्यात आहे, तसेच खत ,बी बीयाने यांच्या वाढत्या किंमती, शेतीसाठी लागणारी मजुरी, बदलते वातावरण, अनियमित पाऊस, यामुळे शेती वर्षानुवर्षे तोट्यात असल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. कुटुंब कसे चालवायचे, मुलांचे शिक्षण , मुलींचे लग्न कसे करावे, असे अनेक कौटुंबिक प्रश्न शेतकऱ्यांपुढे आ वासून उभे राहिले आहे अशा परिस्थितीत कर्ज कसे भरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारचे अर्थ संकल्प अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहील्या दिवसापासून विरोधी पक्षांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला आहे. शेतकरी आणि कर्जमाफी या प्रमुख मुद्यांनी संपूर्ण अधिवेशन गाजले यामुळे ठिकठिकाणी शेतकरी वेगवेगळे आंदोलने करत आहेत. विरोधी पक्ष शेतकरी संघर्ष यात्रा काढणार आहे , त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार कर्जमाफी करण्यासाठी अनुकूल आहे मात्र योग्य वेळ येऊन द्यावी लागेल असे वारंवार सांगितले त्यामुळे सरकार आज ना उद्या नक्कीच कर्जमाफी करेल अशी भोळी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.  शिवाय ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकलेले असेल त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होतो असा मागील इतिहास आहे त्यामुळे आपण कर्जफेडले तर आपल्याला कर्जमाफीचा फायदा होणार नाही त्यामुळे कर्जफेडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसत नाही.  कर्जफेड करण्यास आज शेतकऱ्यांंची परिस्थिती अनुकूल नाही, काही मोठ्या शेतकऱ्यांची असली तरी कर्जमाफीचा फायदा उचलण्यासाठी शेतकरी कर्ज फेड करत नाही. त्यामुळे सहकारी संस्था अडचणीत येण्याची शक्यता आहे. जिल्हा बँक आणखीच तोट्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांचे देखील कर्ज वाढणार आहे, परिणामी शेतकरी आत्महत्त्येचे प्रमाण वाढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. यामुळे कधीतरी कर्जमाफी करण्यास अनुकूल असलेल्या सरकारने तात्काळ कर्जमाफी द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)