देवळाली कॅम्प येथे बिबट्या जेरबंद; लष्करी वसाहतीतीत रहिवाशांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2023 09:45 IST2023-07-17T09:44:53+5:302023-07-17T09:45:07+5:30

गेल्याच आठवड्यात नाशिकरोड येथे जयभवानी रोड परिसरात भल्या सकाळी बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांची झोपमोड झाली होती.

Leopards jailed at Deolali Camp at Nashik; Relief to residents in military colonies | देवळाली कॅम्प येथे बिबट्या जेरबंद; लष्करी वसाहतीतीत रहिवाशांना दिलासा

देवळाली कॅम्प येथे बिबट्या जेरबंद; लष्करी वसाहतीतीत रहिवाशांना दिलासा

विलास भालेराव

नाशिक- नाशिक मध्ये नागरी वसाहतीत बिबट्याच्या शिरकावाचे सत्र सुरूच असून देवळाली कँम्प शहरातील लष्करी वसाहतीत सह्याद्री नगर येथील विठ्ठल गावंडे यांच्या मळ्यात ८ दिवसापुर्वी पिंजरा लावला होता सोमवारी पहाटे साडेतीन वाजता गावंडे मळ्यात जेरबंद झाला

हा बिबट्या नर जातीचा असुन अंदाजे ४ वर्षेचा असल्याची माहिती वनपाल अशोक कानझोडे आणि जैना गोमटे यांनी दिली. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर सकाळी ९ वाजता वन विभागाचे पथक त्याला नाशिक येथे घेऊन गेले.

गेल्याच आठवड्यात नाशिकरोड येथे जयभवानी रोड परिसरात भल्या सकाळी बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांची झोपमोड झाली होती. वन विभागाने त्याला पकडायचे प्रयत्न केले मात्र बिबट्या पळून गेला होता.

Web Title: Leopards jailed at Deolali Camp at Nashik; Relief to residents in military colonies