सिन्नर तालुक्यात बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 16:57 IST2017-12-21T16:57:06+5:302017-12-21T16:57:14+5:30
सिन्नर : तालुक्यातल्या भोजापूर खोºयातील नळवाडी शिवारात नळवाडी-डोंगरगाव सरहद्दीवर दोन वर्षे वयाचा बिबट्या पिंजºयात जेरबंद करण्यात आला.

सिन्नर तालुक्यात बिबट्या जेरबंद
सिन्नर : तालुक्यातल्या भोजापूर खोºयातील नळवाडी शिवारात नळवाडी-डोंगरगाव सरहद्दीवर दोन वर्षे वयाचा बिबट्या पिंजºयात जेरबंद करण्यात आला. नळवाडी शिवारातील सुरेश हांडे यांच्या वस्तीवर अकोले वनविभागाने पिंजरा लावला होता. गेल्या काही दिवसांपासून या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अकोले व सिन्नर वनविभागाचे प्रयत्न सुरु होते. मंगळवारी सावज शोधण्यासाठी आलेला बिबट्या पिंजºयात जेरबंद झाला. या भागात दुचाकीस्वारांवर हल्ला करणारा बिबट्या वेगळा असल्याचे स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे या भागात अजूनही बिबट्याची दहशत कायम आहे. मंगळवारी रात्री शिकारीच्या शोधात बिबट्या हांडे वस्तीजवळ आला होता. पिंजºयातील शेळीचे सावज टिपण्याच्या आशेने तो पिंजºयात गेला. सकाळी बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येवू लागल्याने तो अडकल्याचे वस्तीवरील ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. अडकलेला बिबट्या दोन वर्षे वयाचा नर असून वनविभागाने त्यास तेथून हलविले. दरम्यान, दुचाकीस्वारांवर हल्ला करणारा बिबट्या अजूनही पिंजर्यात अडकलेला नाही. त्यामुळे वनविभागाने नळवाडी शिवारातील पिंजरा कायम ठेवला आहे. दुचाकीस्वारांवर हल्ला करणारा बिबट्या पूर्ण वाढ झालेला असून बुधवारी व गुरुवारी पुन्हा ग्रामस्थांना त्याचे दर्शन झाले. हल्ला होण्याच्या भीतीने ग्रामस्थ सायंकाळनंतर अजूनही दुचाकी वापरत नाहीत. ग्रामस्थांचे रात्रीच्यावेळी बाहेर पडणे बंद झाले आहे. गेल्या महिन्यात नळवाडी शिवारात एक बिबट्या जेरबंद झाला होता. मंगळवारी पहाटे पुन्हा एक बिबट्या पिंजºयात अडकला. मात्र दुचाकीस्वारांवर हल्ला करणारा बिबट्या अजूनही या भागात असल्याने नागरिकांनी सांगितले.