गोदाकाठ भागात बिबट्याची दहशत कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST2021-06-26T04:11:21+5:302021-06-26T04:11:21+5:30
--------------------------- अजून किती बळी जाणार? घोटी- इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव शिवारातील काननवाडी परिसरात तीन दिवसांपूर्वी आईसोबत घराबाहेर असलेल्या गौरी ...

गोदाकाठ भागात बिबट्याची दहशत कायम
---------------------------
अजून किती बळी जाणार?
घोटी- इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव शिवारातील काननवाडी परिसरात तीन दिवसांपूर्वी आईसोबत घराबाहेर असलेल्या गौरी गुरुनाथ खडके या तीन वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला करून तिला फरपटत नेले होते. उपचाराअंती ती बालिका मयत झाली. या घटनेने प्रशासन यंत्रणा व वनविभाग खडबडून जागे झाले असले, तरी त्या बिबट्याचा शोध घेण्यात वनविभाग अजूनही अपयशी ठरल्यामुळे नागरिकांत अजूनपर्यंत भीतीचे वातावरण कायम आहे. तालुक्यातील बिबट्यांची संख्या गत वर्षी अंदाजे ३५ ते ४० इतकी होती. या वर्षी कोरोनाचे कारण सांगून गणना झालीच नसल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनाच्या संकटात दोन वर्षांचा प्रदीर्घ कालावधी गेल्याने बिबट्यांच्या संख्येत हमखास वाढ झालेली दिसून येते. तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या परिवाराला १५ लाख रुपये आर्थिक साहाय्य देण्यात आले. दहा लाख डिपॉझिट स्वरूपात तर पाच लाख रोख स्वरूपात देण्यात येतात. आतापर्यंत ६ पैकी वर्षभरात चार परिवाराला साहाय्य प्राप्त झाले असून दोन परिवारांचे अजून प्रलंबित आहेत. बिबट्यांना तात्काळ जेरबंद करण्यासाठी सक्षम यंत्रणा हवी. मात्र, मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर वाढला असून वन विभागाच्या वतीने कुठल्याही उपाययोजना राबविण्यात येत नसल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बिबट्यांना तात्काळ जेरबंद करण्यासाठी सक्षम यंत्रणा हवी. मात्र, मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर वाढला असून वन विभागाच्या वतीने कुठल्याही उपाययोजना राबविण्यात येत नसल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला जात आहे.