नारायण टेंभी परिसरात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 01:17 IST2020-08-24T23:10:31+5:302020-08-25T01:17:15+5:30

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील नारायण टेंभी परिसरात बिबट्याच्या दर्शनाने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

Leopard terror in Narayan Tembhi area | नारायण टेंभी परिसरात बिबट्याची दहशत

नारायण टेंभी परिसरात बिबट्याची दहशत

ठळक मुद्देबिबट्यांचा संचार असल्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांमध्ये दहशत

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील नारायण टेंभी परिसरात बिबट्याच्या दर्शनाने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
रविवारी चार वर्षांचा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी काहीसा सुटकेचा निश्वास सोडला असला तरी परिसरात अजूनही बिबट्यांचा संचार असल्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांमध्ये दहशत कायम आहे. परिसरात पिंजरा लावण्यात आला होता.
रविवारी रात्री बिबट्या जेरबंद झाला. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी हजर झाले. कारसूळ-लोणवाडी परिसरात मागील आठवड्यात बिबट्याने घराजवळ बांधलेल्या शेळींच्या कळपावर हल्ला केला होता. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात अजून बिबट्यांचा वावर असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Leopard terror in Narayan Tembhi area