दिंडोरी तालुक्यात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 14:32 IST2020-08-18T14:28:33+5:302020-08-18T14:32:06+5:30
वरखेडा : तालुक्यातील काही परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार होत असून, पाळीव प्राणी, श्वानावर हल्ला करून भक्ष करीत असल्याने नागरिक दहशतीखाली वावरत आहे.

दिंडोरी तालुक्यात बिबट्याची दहशत
वरखेडा : तालुक्यातील काही परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार होत असून, पाळीव प्राणी, श्वानावर हल्ला करून भक्ष करीत असल्याने नागरिक दहशतीखाली वावरत आहे.
बिबट्याने वरखेडा, आंबेवणी व चिंचखेड परिसरातील पाळीव श्वानांवर हल्ले करु न ठार केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबट्यांचे उसाच्या शेतात वास्तव्य असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले असून वन विभागाने मागील आठवड्यात येथे पिंजरा लावला असून त्या पिंजऱ्यामध्ये भक्ष ठेवण्याची जबाबदारी वनविभागाची असतानाही भक्ष घालण्यासाठी वनविभाग स्थानिक शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असल्याचे व संबधित अधिकारी या भागात फिरकतही नसल्याचे शेतकरी सांगत आहे.
तालुक्यातील लखमापूर, म्हेळूस्के, परमोरी येथील चार बालकांना बिबट्यांच्या हल्लात जीव गमवावा लागला आहे. वरखेझ व चिंचखेड परिसरातील बिबट्यांचे वाढते हल्ले लक्षात घेऊन वनविभागाने गांभीर्य ओळखून योग्य आणि त्वरीत कार्यवाही करण्याची मागणी चिंचखेडचे रहिवासी करीत आहे.