शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटे परिसरात बिबट्याची दहशत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:47 IST

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मानोरीरोड लगत असणाऱ्या वस्तीकडील शेतकऱ्यांना रात्री साते ते नऊ वाजेच्या दरम्यान अनेकदा बिबट्याचे दर्शन ...

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मानोरीरोड लगत असणाऱ्या वस्तीकडील शेतकऱ्यांना रात्री साते ते नऊ वाजेच्या दरम्यान अनेकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने घबराट निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातील गहू, हरबरा, मका, कांदे व ऊस आदी पिके ऐन मोसमात असल्याने त्यांना पाणी देणे गरजेचे आहे. दर महिन्याला वीज वितरण कंपनीचे शेती पंपासाठी असणाऱ्या विजेचे वेळापत्रक बदलत असल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेकवेळा रात्री उशिरापर्यंत पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. त्यात गेल्या काही दिवसांपासून येथे व परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. नाशिक-पुणे महामार्ग, नांदूरशिंगोटे - निमोणरोड, मानोरी रोड, व चासरोड या भागात अनेक शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन झाले आहेत. त्यामुळे बळीराजा शेतात काम करण्यासाठी धजावत नाही. मंगळवारी व गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास मानोरीरोडलगत असणाऱ्या वस्तीकडे शेताकडे पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतमजुरांना बिबट्याचे दर्शन झाले. अंधार असल्याने भ्रमणध्वनीवरून आसपासच्या शेतकऱ्यांना बिबट्या आले असल्याचे त्यांनी सांगितले. शेतात अनेक ठिकाणी बिबट्याचे ठसेही आढळून आले आहे. गुरुवारी मध्यरात्री रामदास सानप यांच्या मक्याच्या शेतात दडून बसला आहे. वाड्या वस्तीवर अनेकदा रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने भीतीचे वातावरण आहे. बिबट्या दररोज रात्री आपला मुक्काम वेगवेगळ्या ठिकाणी व आसपासच्या शेतात हालवत असल्याने वनविभागाची डोकेदुखी वाढत आहे. वनविभागाने या भागात पाहणी करून तसेच पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.