सावजच्या शोधात बिबट्या खुराड्यात : शेतकऱ्याचे प्रसंगावधान

By Admin | Updated: April 23, 2017 19:14 IST2017-04-23T19:02:05+5:302017-04-23T19:14:45+5:30

डांगसौंदाणे शिवारात बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यात जेरबंद

In a leopard search for the public: Farmer's recommendations | सावजच्या शोधात बिबट्या खुराड्यात : शेतकऱ्याचे प्रसंगावधान

सावजच्या शोधात बिबट्या खुराड्यात : शेतकऱ्याचे प्रसंगावधान

नाशिक : बागलाण तालुक्यातील बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे शिवारात सावजच्या शोधात भटकंती करणारा बिबट्या एका शेतकऱ्याच्या घराजवळील कोंबड्यांच्या खुराड्यात जेरबंद झाला.
रविवारी डांगसौंदाणे येथील शेतकरी बापू पंडित सुलक्षण हे कोंबड्यांना खाद्य टाकण्यासाठी खुराड्याजवळ आले असता खुराड्यात बिबट्याचा वावर त्यांच्या लक्षात आला, त्यांनी प्रसंगावधान राखत त्वरित खुराड्याचा दरवाजा बंद करून घेतला. कोंबड्यांसाठी तयार करण्यात आलेला खुराडा लाकडी नसून मोकळ्या जागेभोवती चेनलिंक फेन्सिंग करत खुराडा तयार करण्यात आला आहे. यामुळे बिबट्या या जाळीमध्ये वावरत होता.


अडीच वर्षांचा बिबट्या शिकार शोधण्यासाठी मानवी वस्तीकडे भटकत या खुराड्यात अडकला. दरम्यान, त्याने बोकडावर हल्ला करण्याच्या नादात थेट कोंबड्यांच्या खुराड्यात जाऊन पडला. सुलक्षण यांनी तत्काळ आरडाओरड करीत नागरिकांना जमविले व घटनेची माहिती बागलाण वन विभागाला दिली. माहिती मिळताच वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंतराव पाटील यांनी घटना स्थळी भेट देऊन तातडीने बिबट्याला ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. दरम्यान, नाशिक येथील वनविभागाच्या कार्यालयातून ‘रेस्क्यू’ पथकाला पाचारण करण्यात आले. पथक पोहचल्यानंतर दुपारी दोन वाजता त्याला बिबट्याला ‘ट्रॅन्क्यूलाईज’द्वारे भूल देण्यात आली. बिबट्या बेशुध्द पडल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पिंजऱ्यातून दोधेश्वर येथील रोपवाटिकेमध्ये हलविले आहे. 

Web Title: In a leopard search for the public: Farmer's recommendations