निफाड परिसरात महाजनपूर येथे बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 18:38 IST2018-08-12T18:36:14+5:302018-08-12T18:38:00+5:30
सायखेडा : गोदाकाठच्या उसाच्या क्षेत्रात नेहमी दर्शन देणाऱ्या बिबट्याने महाजनपूरसारख्या माळरान शिवाराकडे आपला मोर्चा वळविला असून, काही दिवसांपासून नागरिकांना दिसणारा बिबट्या अखेर जेरबंद झाल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.

निफाड परिसरात महाजनपूर येथे बिबट्या जेरबंद
सायखेडा : गोदाकाठच्या उसाच्या क्षेत्रात नेहमी दर्शन देणाऱ्या बिबट्याने महाजनपूरसारख्या माळरान शिवाराकडे आपला मोर्चा वळविला असून, काही दिवसांपासून नागरिकांना दिसणारा बिबट्या अखेर जेरबंद झाल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.
गोदावरी नदीच्या क्षेत्रात बिबट्याचे दर्शन सातत्याने होत असते. बिबट्या दिसणे आणि पिंजरा लावणे नित्याचेच झाले असताना ज्या भागात ऊस अथवा लपण्यासाठी कोणतीही अडचण असणारी जागा उपलब्ध नाही अशा महाजनपूर शिवाराकडे बिबट्याने काही दिवसांपासून आपला मुक्काम ठोकला होता. कुत्रे, शेळी, मेंढी फस्त करून आपली दहशत निर्माण केली होती. या भागात सातत्याने नागरिकांना बिबट्या दिसत होता. अशा भागात नागरिकांच्या मागणीवरून शिवाजी दराडे यांच्या गट नंबर ३१५ या ठिकाणी वनविभागाने दोन दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. पिंजºयात सावज म्हणून शेळी ठेवल्याने शेळीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पहाटे बिबट्या पिंजºयात अलगद आला. सकाळी सरपंच बळवंत फड यांनी वनविभागाला कळविले. वनविभागाचे कर्मचारी शेख, टेकनर यांनी पिंजरा ताब्यात घेऊन बिबट्याला घेऊन गेले.