शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
2
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
6
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
7
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
8
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
9
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 6:56 PM

कळवण : पाण्याच्या शोधात तालुक्यातील मौजे वडाळा गावाच्या शिवारातील विहिरीत रविवारी (दि.१४) रात्रीच्या सुमारास पडलेल्या बिबट्याला जेरबंद करून बाहेर काढण्यात कनाशी वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना यश आले आहे. सोमवारी (दि.१५) रात्री बिबट्याला पुन्हा जंगलात सोडून देण्यात आले.

ठळक मुद्देकळवण : वनविभागाने पुन्हा सोडून दिले जंगलात

कळवण : पाण्याच्या शोधात तालुक्यातील मौजे वडाळा गावाच्या शिवारातील विहिरीत रविवारी (दि.१४) रात्रीच्या सुमारास पडलेल्या बिबट्याला जेरबंद करून बाहेर काढण्यात कनाशी वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना यश आले आहे. सोमवारी (दि.१५) रात्री बिबट्याला पुन्हा जंगलात सोडून देण्यात आले.कळवण तालुक्याच्या पश्चिम भागातील वडाळा व कोसुर्डे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी वडाळागावच्या शिवारातील चिंतामण लक्ष्मण गांगुर्डे यांच्या विहिरीत रविवारी रात्री बिबट्या पडला होता. विहिरीत पाणी जास्त असल्याने विहिरीच्या आतील कठड्यावर बिबट्या बसला होता. विहिरीचे कठडे ढासळलेले असल्याने शिकार करण्याच्या प्रयत्नात बिबट्या विहिरीत पडला असावा असा ग्रामस्थांचा अंदाज आहे.सकाळी बिबट्याच्या ओरडण्याचा आवाज स्थानिक नागरिकांनी ऐकला असता त्यांनी विहिरीकडे धाव घेतली. त्यांना विहिरीत बिबट्या पडलेला आढळला. त्यांनी तात्काळ कनाशी वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून माहिती दिली.सदर घटनेची माहिती मिळताच कनाशी वनक्षेत्रपाल अधिकारी सी. आर. कामडे यांनी कर्मचाºयांसह घटनास्थळ गाठले. विहिरीत पाणी जास्त असल्याने बिबट्याला बाहेर काढण्यात अडथळा निर्माण झाला. तसेच या भागात विजेचे भारनियमन असल्याने त्यात अधिक भर पडली.ग्रामस्थांनी डिझेल मशीनची व्यवस्था करून विहिरीतले पाणी कमी करण्यास मदत केली. त्यानंतर विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. पिंजरा विहिरीत सोडताच बिबट्या पिंजºयात अडकला. त्यानंतर त्यास बाहेर काढण्यात आले. व सोमवारी रात्रीचदूर जंगलात सोडून देण्यात असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाºयांनी दिली.(फोटो १६ कनाशी बिबट्या)वडाळा येथील विहिरीत पडलेला बिबट्या.