बिबट्या विहिरीतून सुखरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:06 IST2017-09-10T00:00:07+5:302017-09-10T00:06:05+5:30
निफाड तालुक्यातील शिंगवे येथील माळवाडी शिवारात दीड ते दोन वर्षाचा बिबट्या शनिवारी (दि. ९) पहाटेच्या सुमारास विहिरीत पडला. वनखात्याने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढत पिंजºयात बंद केले.

बिबट्या विहिरीतून सुखरूप
सायखेडा : निफाड तालुक्यातील शिंगवे येथील माळवाडी शिवारात दीड ते दोन वर्षाचा बिबट्या शनिवारी (दि. ९) पहाटेच्या सुमारास विहिरीत पडला. वनखात्याने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढत पिंजºयात बंद केले.
शिंगवे शिवारात शांताराम वाघ हे शेतात वस्तीवर राहतात. घराशेजारील गट नंबर ८०७ क्षेत्रात विहिरी आहे. भक्ष्याचा पाठलाग करताना रात्री बिबट्या विहिरीत पडला. सकाळी ६ वाजता शांताराम वाघ यांच्या पत्नी अंगण झाडत असताना त्यांना विहिरीतून आवाज आला. कसला आवाज येतो हे पाहण्यासाठी त्यांनी घराशेजारील विहिरीत डोकावून पाहिले असता. त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी पतीला सांगितले. त्यानंतर तातडीने वनविभागाला कळविण्यात आले.
पास्ते परिसरातही दहशत गेल्या तीन दिवसांपासून पास्ते शिवारात बिबट्याने भरदिवसा अनेकांना दर्शन दिल्याने दहशतीचे वातावरण आहे. वनविभागाचे पाच-सहा कर्मचारी घटनास्थळी बिबट्याला पकडण्यासाठी दिवसभर प्रयत्न करत होते. मात्र बिबट्याने त्यांना अनेकदा दर्शन देत चकवा दिला. बिबट्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून, बिबट्याला पकडण्याची मागणी होत आहे.