अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 00:38 IST2021-12-29T00:38:36+5:302021-12-29T00:38:59+5:30
अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सुमारे पाच वर्षीय बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. २८) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
सिन्नर : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सुमारे पाच वर्षीय बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. २८) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.
नाशिक पुणे महामार्गावर सिन्नर बायपासजवळ ॲड. भोजने फार्म हाऊस जवळील छोट्या पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याचे निदर्शनास आले. मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सिन्नरकरांच्या सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. या दरम्यान मृत बिबट्या पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
सिन्नरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पहाणी केली व मृत बिबट्या ताब्यात घेतला. पशुधन अधिकाऱ्यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यास अग्निडाग दिल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव यांनी दिली.