बिबट्याच्या हल्ल्यात गोºहा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 01:02 AM2019-01-20T01:02:43+5:302019-01-20T01:03:47+5:30

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील आडवाडी रस्त्यालगत असलेल्या बेल टेकडी परिसरात बिबट्याने तीन वर्षाच्या गोºह्यावर हल्ला करून त्याला ठार केले.

Leopard killed in the attack | बिबट्याच्या हल्ल्यात गोºहा ठार

बिबट्याच्या हल्ल्यात गोºहा ठार

Next

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील आडवाडी रस्त्यालगत असलेल्या बेल टेकडी परिसरात बिबट्याने तीन वर्षाच्या गोºह्यावर हल्ला करून त्याला ठार केले. या परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असून, वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
ठाणगाव-आडवाडी रोडलगत असणाऱ्या वसंत तुकाराम आव्हाड यांच्या शेत गट क्रमांक १६२९ मध्ये घर असून, घरालगतच जनावरांसाठी पडवी आहे. बिबट्याने शनिवारी पहाटेच्या सुमाराम आव्हाड यांच्या गोठ्यातून तीन वर्षाच्या गोºह्याच्या मानेला पकडून जवळील शेतात ओढत नेऊन फस्त केले. बिबट्याने वासरावर हल्ला केल्याने गोठ्यात बांधलेली गाय व बैल मोठ-मोठ्याने ओरडल्याने वसंत आव्हाड यांनी बाहेर येऊन पाहिले असता बिबट्या गोºह्याला ओढत घेऊन जात होता. आव्हाड यांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना उठविले असता जमावाच्या आवाजाने बिबट्याने धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे गोºह्याचा मृत्यू झाला.

Web Title: Leopard killed in the attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.