बिबट्या ठार

By Admin | Updated: January 2, 2016 22:56 IST2016-01-02T21:53:55+5:302016-01-02T22:56:52+5:30

साकूर फाटा : अज्ञात वाहनाची धडक

Leopard killed | बिबट्या ठार

बिबट्या ठार

घोटी : इगतपुरी तालुक्यातील साकूर फाटा येथील शिवाजी सहाणे यांच्या वस्तीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाला.
बिबट्या अंदाजे पाच ते सहा वर्षांचा असून, शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास नवीन झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ३७वर ही घटना घडली. जंगलतोड आदि कारणांमुळे वन्यजीव मानवी वस्तीत आपले भक्ष्याच्या शोधण्यात येतात. या गावाकडे उसाचे क्षेत्र जास्त असल्याने हे जंगली श्वापदांचा वावर परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. वारंवार पिंजरे लावण्याची मागणी करूनही अधिकारी डोळेझाक करतात. काही दिवसांपूर्वी पाडळी देशमुख, वाडीवऱ्हे महामार्गावरदेखील बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकने मृत्यू झाला होता. ही बाब अतिशय गंभीर असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
सदर घटनेची माहिती येथील शेतकरी शिवाजी सहाणे यांनी सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देताच अधिकारी अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्यास उत्तरीय तपासणीसाठी नाशिकला पाठविण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर सहाणे, शिवाजी सहाणे, सुनील सहाणे, बाळासाहेब सहाणे, संजय सहाणे, दगडू साळवे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.(वार्ताहर)

Web Title: Leopard killed