नाशिकच्या सिडको भागात शिरला बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2023 10:48 IST2023-11-17T10:48:27+5:302023-11-17T10:48:52+5:30

जीएसटी भवनात वन खात्याकडून नाका बंदी, नागरिकांत भीतीचे वातावरण

leopard entered the CIDCO area of Nashik | नाशिकच्या सिडको भागात शिरला बिबट्या

नाशिकच्या सिडको भागात शिरला बिबट्या

नरेंद्र दंडगव्हाळ, नाशिक - शहरातील सिडको येथील सावता नगर भागात आज  पहाटेच्या सुमारास भर वस्तीत बिबट्या फिरत असल्याचे दिसून आल्याने खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती नागरिकांना कळताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. बिबट्या  या परिसरात असलेल्या जीएसटी भवन या भागात असल्याची माहिती वनविभागाला मिळाल्याने वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी ट्रॅप लावला आहे.

आतापर्यंत सिडकोच्या मळे परिसरात दिसणारा बिबट्या आता थेट नागरी वस्तीत घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नागरिक हे झोपेत असल्यामुळे सुदैवाने बिबट्याने कोणावर हल्ला केल्याची अद्याप घटना घडलेली नाही. नाशिक मध्ये या पूर्वी अनेकदा कॉलनी वसाहतीत शिरण्याचे प्रकार घडले आहेत.

Web Title: leopard entered the CIDCO area of Nashik