बिबट्याचा चार वर्षीय बालकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 22:41 IST2021-10-19T22:40:09+5:302021-10-19T22:41:28+5:30

वटार : येथील सावतावाडी वस्तीत बिबट्याने गेल्या एक महिन्यापासून धुमाकूळ घातला असून मंगळवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास वामन बागुल यांच्या घराजवळ चार वर्षीय नातू कार्तिक यांच्यावर बिबट्याने हल्ला केला, त्यात कार्तिक याच्या मानेवर तोंडावर डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत,

Leopard attacks four-year-old boy | बिबट्याचा चार वर्षीय बालकावर हल्ला

बिबट्याचा चार वर्षीय बालकावर हल्ला

ठळक मुद्देबालक गंभीर जखमी : आरडाओरड केल्याने पळाला बिबट्या

वटार : येथील सावतावाडी वस्तीत बिबट्याने गेल्या एक महिन्यापासून धुमाकूळ घातला असून मंगळवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास वामन बागुल यांच्या घराजवळ चार वर्षीय नातू कार्तिक यांच्यावर बिबट्याने हल्ला केला, त्यात कार्तिक याच्या मानेवर तोंडावर डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत, तत्काळ सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता जखमा गंभीर असल्याने प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे बिबट्याची दहशत कायम आहे.

गेल्या आठ दिवसांपूर्वी पोपट खैरनार यांच्या शेळ्यांच्या वाड्यावर हल्ला चढवत बोकड सहित आठ शेळ्या फस्त केल्या होत्या. दररोजच सायंकाळ पासूनच कोणत्या ना कोणत्या शेतकऱ्याला बिबट्या दर्शन देतो. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून पशुधन पुन्हा धोक्यात आले आहे.

Web Title: Leopard attacks four-year-old boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.