शेवगेडांग शिवारात बिबटयाचा वासरावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 17:25 IST2021-07-17T17:23:25+5:302021-07-17T17:25:25+5:30
आहुर्ली : शेवगेडांग शिवारात शुक्रवारी मध्यरात्री बिबटयाने मळयातील घराजवळ असलेल्या गोठयावर चाल करत वासराचा फडशा पाडण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने वासराच्या हंबरण्याने जागी झालेल्या शेतकऱ्यांनीं तातडीने गोठयाकडे धाव घेत वासराचा जीव वाचवला असला तरी बिबटयाच्या या मुक्तसंचारामुळे परिसरात दहशतीचे सावट पसरले आहे.

शेवगेडांग शिवारात बिबटयाचा वासरावर हल्ला
आहुर्ली : शेवगेडांग शिवारात शुक्रवारी मध्यरात्री बिबटयाने मळयातील घराजवळ असलेल्या गोठयावर चाल करत वासराचा फडशा पाडण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने वासराच्या हंबरण्याने जागी झालेल्या शेतकऱ्यांनीं तातडीने गोठयाकडे धाव घेत वासराचा जीव वाचवला असला तरी बिबटयाच्या या मुक्तसंचारामुळे परिसरात दहशतीचे सावट पसरले आहे.
शेवगेडांग येथील मोहन बंडू पोरजे यांची मळयात वस्ती असुन त्यांच्या मालकीच्या वासरावर बिबटयाने हल्ला केल्याची माहिती शेवगेडांगचे उपसरपंच तथा माजी चेअरमन विष्णू पा. पोरजे यांनी कळवली आहे. या हल्ल्यात वासरु जखमी झाले असुन या घटनेनंतर परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे.
अलिकडच्या काळात ईगतपुरी तालुक्यात बिबटयाच्या हल्ल्याचे प्रकार वाढले आहेत.पिंपळगाव मोर, टाकेद परिसरात चक्क दोन तीन लहान बालकाचें बळीही गेलेले आहेत. दरम्यान या हल्ल्यानंतर या ताज्या घटनांना उजाळा मिळाला असुन, बिबटयाच्या या मुक्त संचाराची तातडीने दखल घेऊन बंदोबस्त करावा अशी मागणी विष्णु पा. पोरजे यांचेसह शेवगेडांगचे सरपंच साहेबराव खंडवी, नथु कुटके, मच्छिंद्र पोरजे, शंकर मेदडे, संजय कुटके, आनंदा पोरजे आदीसह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.