करंजी येथे बिबट्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 01:34 IST2018-09-10T01:33:58+5:302018-09-10T01:34:28+5:30
दिंडोरी तालुक्यातील आंबेवणी शिवरातील करंजी येथील लक्ष्मण गवे यांच्या वासरावर बिबट्याने हल्ला केला.

करंजी येथे बिबट्याचा हल्ला
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील आंबेवणी शिवरातील करंजी येथील लक्ष्मण गवे यांच्या वासरावर बिबट्याने हल्ला केला. सदर घटना वणी वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत पाटील यांना कळविण्यात आली. वनक्षेत्र अधिकारी गणेश गांगोडे, वनरक्षक श्रीमती जे.डी. झिरवाळ, यू.जी. सय्यद, श्रीमती एम.आर. म्हस्के, व्ही.आर. गायकवाड, डी.डी. कडाळ यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली व पंचनामा करून पायाचे ठसे घेतले. वनविभागाच्या वतीने या ठिकाणी तत्काळ पिंजरा व ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला आहे. परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. पाच दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर वनविभागाने परमोरी, वरखेडा परिसरात ७० वनरक्षकांचा ताफा, १४ पिंजरे, २२ ट्रॅप कॅमेरे व ड्रोन कॅमेरे लावण्यात आले आहे.