शिक्षक दिनानिमित्त पालकांकडून शाळेला एल.ईडी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 16:03 IST2018-09-11T16:02:55+5:302018-09-11T16:03:12+5:30

साकोरा - नांदगाव तालुक्यातील साकोरा येथिल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक दिनाचे औचित्य साधून पालकांनी वर्गणी जमा करून इयत्ता पहिलीच्या वर्गाला ३२ इंची अँड्रॉइड एल ईडी भेट दिला आहे.

 Led visit to the school from the parents on the occasion of Teachers Day | शिक्षक दिनानिमित्त पालकांकडून शाळेला एल.ईडी भेट

शिक्षक दिनानिमित्त पालकांकडून शाळेला एल.ईडी भेट

ठळक मुद्देएकूण पस्तीस पालकांनी आपल्या परिस्थितीनुसार पैसे जमा करून ३२ इंची अँड्रॉइड एल ईडी खरेदी करून शाळेला भेट दिला.

साकोरा - नांदगाव तालुक्यातील साकोरा येथिल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक दिनाचे औचित्य साधून पालकांनी वर्गणी जमा करून इयत्ता पहिलीच्या वर्गाला ३२ इंची अँड्रॉइड एल ईडी भेट दिला आहे.
साळी यांनी मुख्याध्यापक राजकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यात एकूण पस्तीस पालकांनी आपल्या परिस्थितीनुसार पैसे जमा करून ३२ इंची अँड्रॉइड एल ईडी खरेदी करून शाळेला भेट दिला.याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, सरपंच अनिता सोनवणे, उपसरपंच संदिप बोरसे, संदिप पैठणकर, सतिष भामरे, संजय बोरसे, संदिप बोरसे, संतोष डघळे, नरेंद्र पगारे, आदि उपस्थित होते.

Web Title:  Led visit to the school from the parents on the occasion of Teachers Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.