शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
3
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
4
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
5
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
6
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
7
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
8
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
9
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
10
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
11
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
12
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
13
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
14
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
15
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
16
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
17
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
18
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
19
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
20
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

वक्तृत्व स्पर्धेमुेळे नेतृत्वगुण विकसित : संतोष मंडलेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 1:09 AM

सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी कळत असल्यातरी, पुस्तक वाचन हे फार महत्त्वाचे आहे. वाचनाने चांगले विचार मांडता येतात त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धेमुळे नेतृत्व गुण विकसित होऊन त्यातून एक चांगला राजकीय नेता निर्माण होऊ शकतो,

नाशिक : सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी कळत असल्यातरी, पुस्तक वाचन हे फार महत्त्वाचे आहे. वाचनाने चांगले विचार मांडता येतात त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धेमुळे नेतृत्व गुण विकसित होऊन त्यातून एक चांगला राजकीय नेता निर्माण होऊ शकतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्सचे राज्य अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केले.  निर्मिक फाउण्डेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. लिमये सभागृह येथे निर्मिक फाउण्डेशनच्या वतीने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेली ही चौथी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातून स्पर्धक यात सहभागी झाले होते. यावेळी राजाभाऊ काठे, उद्योजक चंद्रकांत बागुल, राकाशेठ माळी, नगरसेविका सुप्रिया खोडे, अनिल जाधव, सुनील खोडे, विजय राऊत आदी उपस्थित होते.  परीक्षक म्हणून डोंबिवली येथील पुरुषोत्तम वाघ, नाशिकचे जयंत बेहळे, दत्तात्रय वेलजाळी यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउण्डेशनचे अध्यक्ष जयवंत बागुल यांनी केले. सूत्रसंचालन सचिव नितीन पाटील यांनी केले, तर आभार बाबासाहेब खरोटे यांनी मानले. यावेळी संदीप बच्छाव, प्रसाद पवार, हरिभाऊ महाजन, अंबादास शेळके, सचिन बागुल, दादाजी बागुल, जयराम सोनवणे आदी उपस्थित होते.विजेते स्पर्धक‘शिवजयंतीचे जनक : म. जोतिराव फुले, छत्रपती शिवराय-म. फुले-डॉ. आंबेडकर : एक आदर्श गुरु-शिष्य परंपरा, म. फुले व त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म, डॉ. आंबेडकरांची आरक्षण विषयक भूमिका’ या विषयांवर ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रथम क्रमांक नाशिक येथील अमोल गुट्टे याने पटकाविला. द्वितीय क्रमांक जुन्नर येथील शुभम गाढवे याने, तर तृतीय क्रमांक निफाड येथील तेजस्विनी शिंदे यांनी मिळविला. उत्तेजनार्थ बक्षिसाचे मुरबाड येथील महेश घावट व धुळे येथील प्रा. सतीश अहिरे हे मानकरी ठरले.

टॅग्स :Nashikनाशिक