प्रत्युषा महिला मंडळातर्फे सबलीकरणावर व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 00:11 IST2020-03-16T00:11:11+5:302020-03-16T00:11:42+5:30
राजीवनगर येथील प्रत्युषा महिला मंडळाच्या वतीने प्रा. वंदना रकिबे यांचे महिला सबलीकरण व सक्षमीकरण या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.

प्रत्युषा महिला मंडळाच्या वतीने आयोजित सबलीकरण कार्यक्रमप्रसंगी प्रा. वंदना रकिबे, अनिता सोनवणे, स्मिता जोशी आदींसह महिला.
नाशिक : राजीवनगर येथील प्रत्युषा महिला मंडळाच्या वतीने प्रा. वंदना रकिबे यांचे महिला सबलीकरण व सक्षमीकरण या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून युनिक महिला मंडळाच्या अध्यक्ष अनिता सोनवणे व स्वरानंद म्युझिक अकॅडमीच्या संचालक स्मिता जोशी उपस्थित होत्या. याप्रसंगी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सनन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वंदना रकिब यांनी सांगितले की, आज समानतेचे युग असले तरी आणखी मोठ्या प्रमाणात त्यांचा सहभाग वाढला पाहिजे. महिलांनी स्वत: सक्षम बनून सबलीकरणाकडे वाटचाल करावी. यावेळी भारती पाटील, उषा नायर यांचाही सत्कार करण्यात आला. मंडळाच्या अध्यक्ष स्वाती बेलदार यांनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष स्मीता घोटीकर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष माधुरी बापट यांनी सूत्रसंचालन केले. शान बाग यांनी आभार मानले.