दत्तसेवा समितीतर्फे उद्यापासून व्याख्यानमाला
By Admin | Updated: August 21, 2015 23:52 IST2015-08-21T23:51:47+5:302015-08-21T23:52:29+5:30
दत्तसेवा समितीतर्फे उद्यापासून व्याख्यानमाला

दत्तसेवा समितीतर्फे उद्यापासून व्याख्यानमाला
नाशिक : येथील श्री दत्तसेवा समितीच्या वतीने वासुदेवानंद सरस्वती टेम्बे स्वामी यांच्या जयंतीनिमित्ताने रविवारपासून (दि.२३) व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. संत साहित्याचे गाढे अभ्यासक अविनाश हळबे हे तीन दिवस विविध विषयांवर व्याख्यान देणार आहेत. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या व्याख्यानमालेत हळबे हे पहिल्या दिवशी श्री दत्त संप्रदाय व सत्पुरुष, सोमवारी (दि.२४) वासुदेवानंद सरस्वती टेम्बे स्वामी यांचे चरित्र व कार्य तर मंगळवारी (दि.२५) तृतीयपुष्प स्वामी महाराजांचे कृपांकित आणि त्याचे कार्य या विषयावर व्याख्यान देणार आहेत. थोरले स्वामी म्हणजेच टेम्बे स्वामी यांची १५१ वी जयंती कुंभपर्वात साजरी होत आहे. त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
याशिवाय ३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता पालखी सोहळा होणार असून, गणेशबाबा समाधी मंदिर, ड्रिम सिटी, जयशंकर मंगल कार्यालय, मारुती वेफर्स, नवीन शाहीमार्गाने रामकुंड येथे
आल्यानंतर तेथे दत्त संप्रदायातील परिवाराचे तीर्थस्नान होणार आहे. (प्रतिनिधी)