पेठ तालुक्यातील महिला सरपंचपदाच्या आरक्षणाची बुधवारी सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:47 IST2021-02-05T05:47:20+5:302021-02-05T05:47:20+5:30
पेठ : तालुक्यातील सध्या महिला सरपंच असलेल्या ग्रामपंचायती वगळून उर्वरित ठिकाणी महिला सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत बुधवार ३ फेब्रुवारी ...

पेठ तालुक्यातील महिला सरपंचपदाच्या आरक्षणाची बुधवारी सोडत
पेठ : तालुक्यातील सध्या महिला सरपंच असलेल्या ग्रामपंचायती वगळून उर्वरित ठिकाणी महिला सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत बुधवार ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता तहसील कार्यालय पेठ येथे काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार संदीप भोसले यांनी दिली. ग्रामविकास ग्रामपंचायत विभाग महाराष्ट्र सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठी प्रवर्गनिहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सभांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियमान्वये प्राप्त झालेल्या शक्तीचा वापर करून जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडील आदेशाव्दारे नाशिक जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित केलेल्या सरपंचपदांची संख्या अधिसूचित केलेली आहे. सरपंच पदांचे महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी उपरोक्त आदेशाने पेठ तालुक्याकरिता उपविभागीय अधिकारी दिंडोरी यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे.
महिला आरक्षण निश्चित करण्यासंदर्भात ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता तहसील कार्यालय पेठ येथे महिला आरक्षण सोडत सभा आयोजित करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांनी सदर महिला आरक्षण सोडत सभादिनी सर्व प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार संदीप भोसले, निवडणूक नायब तहसीलदार सुदेश निरगुडे यांनी केले आहे.