शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

सिन्नरमधील १०० ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 14:46 IST

सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांची मुदत जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत संपत आहे.

सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांची मुदत जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत संपत आहे. त्यामुळे येथे नव्याने पंचवार्षिक निवडणूका घेण्याची तयारी महसूल विभागाकडून सुरु करण्यात आली. त्यासाठी तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींमध्ये ३ व ४ फेब्रुवारी रोजी आरक्षण सोडतीसाठी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली. सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या विशेष ग्रामसभेत आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्यासह पंचायत समिती आणि तहसीलच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांची सोडत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी दोन दिवस ही प्रक्रि या राबविण्यात येणार असून प्रत्येक ग्रामपंचायतीस विशेष ग्रामसभेच्या वेळाही निश्चित करण्यात आल्या आहेत. ३ फेब्रुवारीला ५४ तर ४ फेब्रुवारीला ४६ गावांच्या विशेष ग्रामसभा होणार आहे. ग्रामस्थांना या विशेष ग्रामसभेची तीन ते चार दिवस अगोदर माहिती व्हावी, या उद्देशाने ग्रामसेवकांनी या आरक्षण सोडतीचे स्थळ, वेळ, दिनांक याबाबत दर्शनीय भागात प्रसिद्धी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत संपत असल्याने पुढच्या सहा महिन्यात तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. एकाच वेळी १०० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने प्रशासनावरही मोठा ताण पडणार आहे.----------या ग्रामपंचायतीच्या होणार निवडणुकातालुक्यातील आडवाडी, बोरखिंड, बारागाव पिंप्री, भोकणी, लक्ष्मणपुर, भरतपुर (विघ्नवाडी), चंद्रपूर, खापराळे, चापडगाव, चास, दहीवाडी, महाजनपूर, दापूर, देवपूर, धोंडविरनगर, हिवरगाव, जामगाव, जामगाव, कुंदेवाडी-मजरे, कुंदेवाडी मौजे, कनकोरी, खंबाळे, मेंढी, मºहळ बुद्रुक, पांढुर्ली, पांगरे बुद्रुक, पिंपळे, पंचाळे, कहांडळवाडी (शिवाजीनगर), सोनांबे, वावी, वडगाव-सिन्नर, हरसुले, जयप्रकाश नगर, सोनारी, धारणगाव, धुळवड, घोरवड, हिवरे,मुसळगाव, मानोरी, निमगाव-सिन्नर, पास्ते, पांगरी खुर्द, पुतळेवाडी (रामपूर), सोमठाणे, सुळेवाडी (सुंदरपुर), सावतामाळी नगर, श्रीरामपूर (शिंदेवाडी), यशवंतनगर (पिंपरवाडी), निमगाव-देवपूर, घोटेवाडी (आशापूरी), दोडी बुद्रुक, दातली, केदारपुर, शहापूर, सोनवाडी, सुरेगाव, सरदवाडी, विंचूरदळवी, वडांगळी, पाथरे खुर्द, धोंडबार, आटकवडे, औढेवाडी, चिंचोली, दोडी खुर्द, फुलेनगर (माळवाडी), गोंदे, जोगलटेंभी, कोळगाव माळ, खडांगळी, मलढोण, रामनगर, सांगवी, वडझिरे, मिठसागरे, डुबेरे, फर्दापूर, गुळवंच, कोमलवाडी, कोनांबे, खोपड़ी बुद्रुक, खोपड़ी खुर्द, मीरगाव, माळेगाव, मापारवाडी, नायगाव, नळवाडी, फत्तेपूर, निºहाळे, पाटोळे, पिंपळगाव, पाडळी, पाथरे बुद्रुक, शिवडे, सोनगिरी, आगासखिंड, ब्राह्मणवाडे, शिवाजीनगर (दापूर), वारेगाव, बेलू या ग्रामपंचायतीचा यात समावेश आहे.

टॅग्स :Nashikनाशिक