शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

राजोळेवस्ती शाळेत विद्यार्थ्यांसाठी ‘वुई लर्न इंग्लिश’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 10:50 PM

इंग्रजी विषयाची कौशल्ये शालेय स्तरावर विकसित करणे गरजेचे आहे. या विषयाचे अध्ययन अध्यापन करताना ग्रामीण भागात अनेक अडचणी येतात. मुले इंग्रजी वाचतात, लिहितात पण बोलत नाहीत. हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून राजोळेवस्ती शाळेचे प्रयोगशील शिक्षक पांडुरंग देवरे व यशस्वी कुंभार्डे यांनी इंग्रजी विषयाची आवश्यक कौशल्ये शाळास्तरावर विकसित करण्याचा चंग बांधला आहे.

ठळक मुद्देइतर शाळांनाही ठरणार पथदर्शी इंग्रजीची गोडी वाढविण्यासाठी शिक्षकांचा चंग

सायखेडा : इंग्रजी विषयाची कौशल्ये शालेय स्तरावर विकसित करणे गरजेचे आहे. या विषयाचे अध्ययन अध्यापन करताना ग्रामीण भागात अनेक अडचणी येतात. मुले इंग्रजी वाचतात, लिहितात पण बोलत नाहीत. हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून राजोळेवस्ती शाळेचे प्रयोगशील शिक्षक पांडुरंग देवरे व यशस्वी कुंभार्डे यांनी इंग्रजी विषयाची आवश्यक कौशल्ये शाळास्तरावर विकसित करण्याचा चंग बांधला आहे. शाळेने ‘वुई लर्न इंग्लिश’ या नावाने हा उपक्र म सुरू केला असून, यात सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले आहे. राजोळेवस्ती शाळेने साकारलेल्या उपक्रमाचा गुणवत्ता विकास घडवून आणण्यासाठी शिक्षकांना निश्चित फायदा होईल. या कार्यक्र मास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, उपक्र माबद्दल अगदी पहिलीच्या चिमुकल्या बालकापासून ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. इंग्रजी भाषा सोपी कशी शिकविता येईल हाच उद्देश या उपक्रमाचा असणार आहे. उपक्रमास गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार, विस्तार अधिकारी कैलास बोरसे, केंद्रप्रमुख वाघ यांचे मार्गदर्शन लाभले आहे. मुख्याध्यापक पांडुरंग देवरे व शिक्षक यशस्वी कुंभार्डे या उपक्रमाचे संयोजन करीत आहेत.काय आहे उपक्रम...इयत्ता वार या विषयाच्या क्षमता मुलांमध्ये विकसित करणे, बालकांची शब्द संपत्ती वाढविणे, बालवयातच इंग्रजी वाचनाची गोडी लावणे, संवाद कौशल्ये वाढीस लावणे, इंग्रजी बोलण्याविषयी आत्मविश्वास निर्माण करणे, सभाधीटपणा निर्माण करणे आदीसाठी कृतियुक्त अध्यापन पद्धतीचा पुरेपूर उपयोग या प्रकल्पात करण्यात आला असून, इतर शाळांनाही त्याचा फायदा व्हावा यासाठी या उपक्र मांतर्गत शाळा स्वनिर्मित व्हिडीओ निर्मिती करीत असून, या विषयाचे अध्यापन कृतिशील, रंजक करण्याचा प्रयत्न शाळेचा राहणार आहे. अक्षर वाचन, शब्द वाचन, छोटी वाक्ये वाचन, छोटा उतारा वाचन, यात विविध छोट्या-छोट्या अ‍ॅक्टिव्हिटींचा समावेश करून मुलांची या विषयाची तयारी करून घेतली जाणार आहे. छोटे घटक घेऊन त्यांचे नाट्यीकरण करीत मुलांना सहज, सोप्या भाषेत घटकाचे स्पष्टीकरण केले. णार आहे. यासाठी शाळेने विषयाशी संबंधित शैक्षणिक साहित्यनिर्मिती केली आहे. या अ‍ॅक्टिव्हीटींचे व्हिडीओ यू-ट्यूबच्या माध्यमातून इतर शाळांपर्यंत पोहोच केले जात आहेत.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळाenglishइंग्रजी