ओझरच्या कर्णबधिर विद्यार्थ्यांची झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 10:25 PM2021-03-11T22:25:08+5:302021-03-12T00:37:32+5:30

ओझरटाऊनशिप : डॉक्टर ए. पी जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशमार्फत देशातील १००० विद्यार्थ्यांनी १०० लघुउपग्रह बनवून ते अवकाशात सोडले. यात ओझरच्या आर्या तुषार थोरात आणि मल्हार मदन ठाकरे या दोन्ही कर्णबधिर विद्यार्थ्यांनी आपली चुणूक दाखवून दिली आहे.

A leap of deaf students in Ozark | ओझरच्या कर्णबधिर विद्यार्थ्यांची झेप

ओझरच्या कर्णबधिर विद्यार्थ्यांची झेप

Next
ठळक मुद्देनाशिकच्या ३० जणांत ९ कर्णबधिर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला

ओझरटाऊनशिप : डॉक्टर ए. पी जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशमार्फत देशातील १००० विद्यार्थ्यांनी १०० लघुउपग्रह बनवून ते अवकाशात सोडले. यात ओझरच्या आर्या तुषार थोरात आणि मल्हार मदन ठाकरे या दोन्ही कर्णबधिर विद्यार्थ्यांनी आपली चुणूक दाखवून दिली आहे.

या मोहिमेची दखल वर्ल्ड रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थांनी घेतली असून लवकरच त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालयात हे दोघे विद्यार्थी ६ वी इयत्तेत शिक्षण घेत असून त्यांच्यासह नाशिकच्या ३० जणांत ९ कर्णबधिर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. इतर सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत कर्णबधिर विद्यार्थ्यांकडून हे उपग्रह तयार करून घेण्यासाठी माई लेले संस्थेच्या शिक्षकांना विशेष परिश्रम घ्यावे लागले. परंतु हार न मानता त्यांनी ही शेवटी विद्यार्थ्यांकडून उपग्रह बनवलेच. यामध्ये अर्चना कोठावदे, वर्षा काळे, सुजाता राजेभोसले या शिक्षिकांनी मेहनत घेतली तर संस्थेचे पदाधिकारी चंद्रकांत धामणे, विजय डोंगरे, सुधाकर माळी, शांताराम आहिरे, निरंजन ओक, मुख्याध्यापक संतोष पाटील यांचे वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
 

Web Title: A leap of deaf students in Ozark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.