मालेगाव कॅम्पातील जलवाहिनीला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 22:41 IST2019-12-08T22:21:42+5:302019-12-08T22:41:31+5:30
खडकी : मालेगाव कॅम्प भागात महानगरपालिकेच्या जलवाहिनीला गळती लागल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच अतिरिक्त पाण्याने दलदल निर्माण झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याअगोदर जलवाहिनी दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहे.

मालेगाव कॅम्पात जलवाहिनीला गळती लागली असून, हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खडकी : मालेगाव कॅम्प भागात महानगरपालिकेच्या जलवाहिनीला गळती लागल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच अतिरिक्त पाण्याने दलदल निर्माण झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याअगोदर जलवाहिनी दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहे.
कॅम्पातील पंचशीलनगरला जोडला जाणारा मुख्य रस्त्याच्या ठिकाणी जलवाहिनी फुटल्याने पिण्याचे पाणी वाया जात आहे. गिरणा नदी सहामाही वाहत असली तरी पाण्याचे जतन करणे गरजेचे आहे. गतवर्षाच्या दुष्काळाने नागरिक होरपळले आहे.
पाण्याचा अपव्यय टाळला तरच पाण्याचे नियोजन होणार आहे. जुनाट झालेल्या जलवाहिनी बदलून महानगरपालिकेने नव्या जलवाहिन्या बसविण्याची मागणी नागरिक करीत आहे.