गुदामात गॅस सिलिंडरला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:17 IST2021-05-21T04:17:12+5:302021-05-21T04:17:12+5:30

भगूर : आडगाव रस्त्यावर बापू गॅस गुदाम असून, गुरुवारी गुदामातील एका सिलिंडरला गळती लागून पेट घेतल्याची घटना घडली. ही ...

Leakage of gas cylinder in the warehouse | गुदामात गॅस सिलिंडरला गळती

गुदामात गॅस सिलिंडरला गळती

भगूर : आडगाव रस्त्यावर बापू गॅस गुदाम असून, गुरुवारी गुदामातील एका सिलिंडरला गळती लागून पेट घेतल्याची घटना घडली. ही बाब वेळीच लक्षात आल्याने तात्काळ अग्निशमन दलाला माहिती कळविण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवानवेळेत दाखल झाल्याने त्यांनी पेटलेले सिलिंडर सुरक्षितरीत्या बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार औरंगाबादरोड मानूर शिवारात भगूर आडगांव रस्त्यावर यश हेबांडे यांचे हिंदुस्थान पेट्रोलियमचे बापू गॅस गुदाम आहे. गुदामामध्ये सुमारे ४००च्या वर सिलिंडर होते. गुरुवारी सकाळी गुदामातील एक भरलेले गॅस सिलिंडर लिक झाले व अचानक पेट घेतला. त्यानंतर गुदामात काम करणारे कामगार घाबरले त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला संपर्क साधून घटनेची माहिती दिली. काही वेळांत नाशिकरोड अग्निशमन दलाचे एक वाहन पाण्याच्या बंबासह घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पेटते सिलिंडर व आगीची झळ लागलेले सिलिंडर गुदामाच्या बाहेर काढले. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान वेळेत पोहोचल्याने हानी टळली.

Web Title: Leakage of gas cylinder in the warehouse