राष्ट्र सेवा दलाच्या वतीने नेतृत्व-व्यक्तिमत्त्व शिबिर

By Admin | Updated: May 15, 2014 23:58 IST2014-05-15T23:45:49+5:302014-05-15T23:58:05+5:30

नाशिक : रचना ट्रस्ट येथे राष्ट्र सेवा दलाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसांचे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात हास्ययोग सत्रात १५० विद्यार्थी सहभागी झाले होते.

Leadership-Personality Camp on behalf of Nation Seva Dal | राष्ट्र सेवा दलाच्या वतीने नेतृत्व-व्यक्तिमत्त्व शिबिर

राष्ट्र सेवा दलाच्या वतीने नेतृत्व-व्यक्तिमत्त्व शिबिर

नाशिक : रचना ट्रस्ट येथे राष्ट्र सेवा दलाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसांचे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात हास्ययोग सत्रात १५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
शिबिरात विद्यार्थ्यांना नेतृत्व व व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे देण्याबरोबरच त्यांना हास्ययोगाचेही महत्त्व पटवून देण्यात आले. महाराष्ट्र हास्ययोग संघाच्या अध्यक्ष डॉ. सुषमा दुगड यांनी व्यक्तिमत्त्व विकासात हास्ययोगाचे स्थान, त्याची उपयुक्तता याविषयी माहिती दिली, तसेच मुलांकडून नमस्ते, बलून, लस्सी, लायन, डान्सिंग व सिंगिंग लाफ्टरचे प्रकार करून घेतले. हास्ययोगातील टाळ्यांमुळे ॲक्युप्रेशर थेरपी होते व दीर्घ श्वसनामुळे शरीरातील प्रत्येक पेशींपर्यंत प्राणवायू पोहोचला जातो. त्यामुळे अंगदुखी थांबते. वरचेवर होणारे संसर्ग कमी होतात. मुलांची मनाची एकाग्रता वाढते. लेखनाचा वेग वाढतो, असेही दुगड यांनी सांगितले. यावेळी प्रसन्न हास्ययोग क्लबचे ॲड. आर. डी. बाफणा, सौ. श्रद्धा मिटकरी, सौ. प्रतिभा तांबट, स्वानंद हास्ययोग क्लबच्या अध्यक्ष श्रीमती जयश्री दामले, तसेच शिबिराचे आयोजक संदीप भावसार, राम गायटे, दिनकर पाटील, स्नेहल एकबोटे आदि उपस्थित होते. राष्ट्र सेवा दलाचे वसंत एकबोटे यांनी आभार मानले.

Web Title: Leadership-Personality Camp on behalf of Nation Seva Dal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.