शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांच्या मदतीला व्यापारी धावणार एलबीटी

By admin | Updated: July 28, 2015 01:12 IST

आकारणी : उद्योजकांच्या संघटनांमध्ये मतभेद

उद्योजकांच्या मदतीला व्यापारी धावणारएलबीटी आकारणी : उद्योजकांच्या संघटनांमध्ये मतभेदनाशिक : एलबीटी रद्द करण्यासंबंधी व्यापाऱ्यांनी वेळोवेळी पुकारलेल्या आंदोलनाला उद्योजकांची साथ मिळाली नसली तरी आता सरसकट एलबीटी रद्द करण्याच्या उद्योजकांच्या मागणीला व्यवसायधर्म म्हणून व्यापाऱ्यांनी पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, एलबीटीवरून उद्योजकांच्या संघटनांमध्येच मतभेद असून, भाजपप्रणीत संघटनांकडून शासनाच्या भूमिकेचे स्वागत केले जात असल्याने उद्योजकांमध्ये फूट पडल्याचे दिसून येत आहे.नाशिक महापालिका हद्दीतून एलबीटी हद्दपार करण्यात यावा या मागणीसाठी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून शहरातील व्यापारी संघटना सरकारविरोधी लढा देत आल्या आहेत. व्यापाऱ्यांच्या ‘फाम’ या महासंघामार्फत राज्यभरात एलबीटी विरोधात रणशिंगही फुंकले गेले होते. प्रसंगी लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना व्यापारी-उद्योजकांकडून हिसका दाखविण्याचा इशाराही देण्यात आला होता. सरकारच्या एलबीटी धोरणाविरोधात सुरुवातीला व्यापारी संघटना एकत्र आल्या असताना उद्योजकांच्या संघटनांनी त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली होती. जकात कशी जाचक आहे आणि एलबीटी कशी उपयुक्त ठरणार आहे, यासाठी उद्योजकांच्या संघटनांनी एलबीटीची भलामण केली होती. त्यातूनच व्यापारी व उद्योजक यांच्यात फूटही पडली होती. व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना नंतर महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या बैठकांना निमंत्रण टाळले जात होते. आता चित्र उलटे झाले असून, शासनाने ५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवर एलबीटी रद्द करण्याची आणि ५० कोटींवर उलाढालीवर एलबीटी लागू ठेवण्यासंबंधी अधिसूचना प्रसिद्ध केल्याने व्यापारीवर्गाकडून स्वागत होत असताना उद्योजकांची कोंडी झाली आहे. उद्योजकांनी आता सरसकट एलबीटी रद्द करण्याची भूमिका जाहीर केली आहे. उद्योजक एलबीटीविरोधी एकत्र येण्याचे आवाहन करत असतानाच भाजपाप्रणीत उद्योजकांच्या संघटनांनी शासन निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यामुळे उद्योजकांमधील मतभेदही उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे लघुउद्योजकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या परंतु निमामध्ये विविध समित्यांवर काम करणाऱ्या उद्योजकांनी शासन निर्णयाचे स्वागत केल्याने उद्योजकांमध्ये फूट पडल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)