समृद्धीच्या सोनपावलांनी झाले लक्ष्मीचे आगमन

By Admin | Updated: October 31, 2016 02:15 IST2016-10-31T02:07:43+5:302016-10-31T02:15:34+5:30

आज पाडवा : साडेतीन मुहूर्ताची पर्वणी

Laxmi came to prosperity by sonpawas | समृद्धीच्या सोनपावलांनी झाले लक्ष्मीचे आगमन

समृद्धीच्या सोनपावलांनी झाले लक्ष्मीचे आगमन

नाशिक : समृध्दी आली सोनपावली- उधळण झाली सौख्याची असे म्हणत शहरात सर्वत्र रविवारी (दि. ३०) लक्ष्मीपूजन उत्साहात साजरे करण्यात आले. व्यापारी वर्गानेदेखील या नववर्षाचे जल्लोषात स्वागत केल्याचे चित्र रविवारी शहरात बघायला मिळाले.
शुभ आणि अमृत मुहूर्त साधत नाशिककरांनी रविवारी संध्याकाळी पारंपरिक पध्दतीने लक्ष्मीपूजन केले. रविवारी अभ्यंगस्नाला देखील महत्व असल्याने नागरिकांनी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नानानंतर फटाक्याची आतिषबाजी करत कुटुंबातील सदस्यांसमवेत फराळ करण्याचा आनंद लुटला. रविवारी तिन्ही सांजेला लक्ष्मीपूजनासाठीदेखील शहरात भक्तिमय वातावरण पहायला मिळाले. यावेळी लक्ष्मीच्या प्रतिमेसह सोने, चांदी आणि सोन्याची नाणी, रोख पैसे यांची मनोभावे पूजा करण्यात आली.

Web Title: Laxmi came to prosperity by sonpawas