इगतपुरीत चौकोनाची लक्ष्मणरेषा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 23:13 IST2020-03-27T23:13:41+5:302020-03-27T23:13:57+5:30
कोरोना संसर्ग रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून इगतपुरी शहरातील किराणा दुकानदारांनी ग्राहकांना उभे राहण्यासाठी पांढऱ्या रंगाचे चौकोनात सुरक्षित अंतर ठेवत विक्री केली.

इगतपुरीत चौकोनाची लक्ष्मणरेषा
इगतपुरी : कोरोना संसर्ग रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून इगतपुरी शहरातील किराणा दुकानदारांनी ग्राहकांना उभे राहण्यासाठी पांढऱ्या रंगाचे चौकोनात सुरक्षित अंतर ठेवत विक्री केली. ग्राहकही तोंडाला मास्क बांधूनच किराणा घ्यायला येताना दिसत होते. एकावेळी एकच व्यक्ती दुकानात जाईल, अशी व्यवस्था करण्यात आली होती. नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला गायकवाड-पेखळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत ताठे व त्यांच्या पथकाने दुकानदारांना सूचना केल्या.