विल्होळीचे सरपंच बाजीराव गायकवाडांकडून ‘रोजगार निर्मिती’ला चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 20:09 IST2019-02-28T20:08:13+5:302019-02-28T20:09:52+5:30
मागील वर्षभरात ग्रामपंचायत हद्दीत त्यांनी २० लहान-मोठे उद्योग उभारले. २३ महिला बचत गटांची गावात स्थापना करून त्यांना लहानमोठे गृहउद्योग मिळवून दिले.

विल्होळीचे सरपंच बाजीराव गायकवाडांकडून ‘रोजगार निर्मिती’ला चालना
नाशिक: जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावपातळीवर स्मार्ट विकासकामे करणाऱ्या १३ सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. ‘जो गावची शान, त्याचाच हा बहुमान’ असे ब्रीद घेऊन मागील वर्षांपासून लोकमतने ‘सरपंच अवॉर्ड’चा अभिनव उपक्र म राज्यभर सुरू केला. या उपक्रमांतर्गत इगतपुरी तालुक्यातील विल्होळी गावात सरपंच बाजीराव अंबू गायकवाड यांनी रोजगार निर्मितीला चालना दिली. त्याबद्दल त्यांना ‘रोजगार निर्मिती ’ या गटात पुरस्काराने गौरविण्यात आले.
मागील वर्षभरात ग्रामपंचायत हद्दीत त्यांनी २० लहान-मोठे उद्योग उभारले. २३ महिला बचत गटांची गावात स्थापना करून त्यांना लहानमोठे गृहउद्योग मिळवून दिले. सरपंचांकडून स्व-खर्चाने १५ महिलांना शिवणकाम करण्यासाठी शिलाई यंत्रांचे वाटप केले. याशिवाय गावातील रस्ते कॉँक्रीट केले. यामुळे त्यांना ‘लोकमत’च्या वतीने ‘रोजगार निर्मिती’ गटात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.